शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धीरेंद्र शास्त्रींचा अनोखा भक्त! ३० हजाराचं कर्ज काढून गाठलं बागेश्वर धाम; मुंबईतील व्यक्तीची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 20:14 IST

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे मठाधिपती बागेश्वर धाम हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

मध्य प्रदेशातीलबागेश्वर धामचे मठाधिपती बागेश्वर धाम हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सामान्यांपासून सेलिब्रेटीपर्यंत त्यांची पोहोच असल्याचे दिसते. भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू देखील धीरेंद्र शास्त्रींच्या दर्शनासाठी बागेश्वर धामला जात असतात. धीरेंद्र शास्त्रींची दिवसेंदिवस क्रेझ वाढतच चालली असून, आता त्यांचा एक भक्त तीस हजारांचं कर्ज काढून बागेश्वर धामला पोहचला. 

धीरेंद्र शास्त्री यांना मोबाईलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या त्यांच्या एका भक्तानं ३० हजार रूपयाचं कर्ज काढून बागेश्वर धाम गाठलं. मुंबईतील या व्यक्तीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. धीरेंद्र शास्त्रींचा हा अनोखा भक्त पंखा रिपेअरिंग करून आपला उदरनिर्वाह करतो. बागेश्वर धामला जाण्यासाठी पैशांचं नियोजन न झाल्यानं कर्ज काढल्याचं तो सांगतो. 

'बागेश्वर धाम सरकार' या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तो भक्त म्हणतो की, माझं घर होत नाही म्हणून मी इथे आलो आहे. शास्त्रींचे ऑनलाइन व्हिडीओ पाहून खूप प्रभावित झालो, त्यांच्या कथा ऐकायला चांगल्या वाटतात. भाड्याचं दुकान बंद करून फक्त त्यांची झलक पाहण्यासाठी आलो आहे. तसेच कर्ज का काढले असे विचारले असता त्याने म्हटले, "प्रवासासाठी पैसे नसल्यामुळे ३० हजार रूपयाचं कर्ज काढावं लागलं."

कुलदीप यादवची बागेश्वर धामला भेट आशिया चषकात चमकदार कामगिरी करणारा भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने देखील बागेश्वर धामला भेट दिली. आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी देखील कुलदीप यादवने बागेश्वर धामला भेट दिली होती. खरं तर जुलैमध्ये देखील कुलदीप आशीर्वाद घेण्यासाठी बागेश्वर धामला पोहोचला होता. "चायनामॅन म्हणून ओळखला जाणारा जगप्रसिद्ध भारतीय फिरकीपटू आणि सरकारचे आवडते शिष्य कुलदीप यादव याने सरकारला भेट देण्यासाठी बागेश्वर धाम गाठले. आशिया चषकात मालिकावीराचा किताब पटकावल्यानंतर सरकारचे आशीर्वाद घेण्यासाठी त्याने हजेरी लावली. आगामी विश्वचषकात चांगली कामगिरी करावी यासाठी त्याने आशीर्वाद घेतले", अशा आशयाचे कॅप्शन असलेली पोस्ट 'बागेश्वर धाम सरकार' या अकाउंटवरून करण्यात आली आहे. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामMadhya Pradeshमध्य प्रदेशKuldeep yadavकुलदीप यादव