शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तहाणलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं कर्मचाऱ्याला महागात पडलं! वन विभागानं निलंबित केलं, नेमकं काय घडलं? बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:22 IST

या कर्मचाऱ्याचे नाव सत्यनारायण गुर्जर असे आहे. ते कूनो नॅशनल पार्कमध्ये चीत्ता मित्र म्हणून कार्यरत होते. ते वन विभागात ड्रायव्हर म्हणून काम करत होते....

मध्य प्रदेशातील शेओपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणे वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. एवढे महागात की, त्याला त्याची नोकरी गमवावी लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित केले आहे. "चित्त्यांच्या एवढे जवळ जाणे, हे वन्यजीव संवर्धन नियमांच्या विरुद्ध आहे. यामुळे त्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकला असता," असे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

कूनो नॅशनल पार्कमध्ये चीत्ता मित्र म्हणून होते कार्यरत -या कर्मचाऱ्याचे नाव सत्यनारायण गुर्जर असे आहे. ते कूनो नॅशनल पार्कमध्ये चीत्ता मित्र म्हणून कार्यरत होते. ते वन विभागात ड्रायव्हर म्हणून काम करत होते. व्हायरल व्हिडिओमध्ये काही चित्ते झाडाखाली शांतपणे बसलेले दिसत आहे. तेवढ्यात गुर्जर हे हातात पाण्याची कॅन घेऊन तेथे पोहोचतात आणि एका थाळीमध्ये त्या चित्त्यांना पाणी देऊ लागला. पाणी पिण्यासाठी हे चित्ते त्या व्यक्तीच्या अगदी जवळ येतात आणि पाणी पिऊ लागतात. विशेष म्हणजे, सत्यनारायण गुर्जर हे साधारणपणे केवळ दीड मीटर अंतरावरून बिबट्यांना पाणी देताना दिसत आहेत. 

इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता -एवढेच नाही तर वन विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात परदेशातून चित्ते आणण्यात आले आहेत. या उद्यानात त्यांचे संवर्धन केले जात आहे. हे उद्यान वन्यजीव संवर्धनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. उद्यानात वन्यजीवांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क प्रतिबंधित आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीforestजंगलforest departmentवनविभाग