शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ज्या व्यक्तीवर प्रवेश शुक्लाने लघुशंका केली, त्याचे पाय मुख्यमंत्र्यांनी धुतले, माफीही मागितली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 12:03 IST

गुरुवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दशमत यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली आणि त्यांचे पाय धुतले.

मध्य प्रदेशातील सिधी येथील लघुशंकेच्या घटनेतील पीडित व्यक्तीची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी सकाळी भेट घेतली. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी पीडित व्यक्तीची माफी मागितली. एवढेच नाही तर त्यांनी त्या व्यक्तीचे पाय धुवून दु:खही व्यक्त केले आहे. अलीकडेच माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मध्य प्रदेशातील सिधीमध्ये समोर आली. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये प्रवेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केली होती.

दशमत असे या आदिवासी पीडित व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दशमत यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली आणि त्यांचे पाय धुतले. तसेच, या घनटेमुळे मन खूल दुखावल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.  याचबरोबर, शिवराज सिंह चौहान यांनी दशमत यांच्याकडून त्यांच्या कुटुंबीयांचीही माहिती घेतली. तसेच, दशमत हे सुदामा असल्याचे सांगत शिवराज सिंह चौहान यांनी स्वत:ला त्यांचे मित्र असल्याचे म्हटले आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी दशमत यांच्या कुटुंबाला सरकारच्या योजनांमधून काय लाभ मिळत आहेत, याबद्दल चर्चा केली. तसेच जेव्हा तुम्हाला कशाचीही गरज असेल तेव्हा तुम्ही मला सांगा, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. तसेच, शिवराज सिंह चौहान म्हणाले की, गुन्हेगाराला कोणताही धर्म, पक्ष, जात नसते. त्यामुळेच दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली असून, मी सर्वांना आवाहन करतो की, कोणाशीही भेदभाव करू नका.

दरम्यान, प्रवेश शुक्ला या व्यक्तीने दशमत यांच्यावर लघुशंका केली होती. या घटनेचा ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर सोशल मिडियावर संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी मंगळवारी रात्री प्रवेश शुक्ला याला अटक करण्यात आली. तसेच, प्रवेश शुक्लावर कलम 294, 594 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच एससी-एसटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर शिवराज सिंह चौहान यांनी आरोपी प्रवेश शुक्लावर एनएसए लावण्याचे आदेशही दिले होते. 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशSocial Viralसोशल व्हायरल