शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

माेदींच्या संकल्पनेतून बनणार ‘संकल्पपत्र’, अमित शाह यांनी दिला विजयाचा मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 12:49 IST

महिलांसाठी घाेषणा अपेक्षित, भाजपचा जाहीरनामा लवकरच

भाेपाळ: भाजपने मध्य प्रदेश विधानसभेसाठी जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या संकल्पनेतून पक्षाचे ‘संकल्पपत्र’ तयार केले जाणार आहे. त्यात महिलांसाठी माेठ्या घाेषणा राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘एमपीच्या मनात माेदी, माेदींच्या मनात एमपी’ या संकल्पनेवर आधारित संकल्पपत्र तयार करण्यात येत आहे. त्यात गरीब कल्याण, महिला सबलीकरण आणि तरुणांवर विशेष भर देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. छत्तीसगड, मध्य प्रदेश व शेवटी राजस्थानचे संकल्पपत्र जाहीर हाेईल.

‘एआयएमआयएम’ निवडणूक रिंगणात

मतसंग्रामात ‘एआयएमआयएम’ पक्षानेही उडी घेतली आहे. पक्षाने बऱ्हाणपूर येथून माजी विराेधीपक्ष नेते नफीस मंशा यांना उमेदवारी दिली आहे. काॅंग्रेसने अल्पसंख्याक समुदायातून उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज हाेते.

अमित शाह यांनी दिला विजयाचा मंत्र

सागर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘बूथ जिंका, निवडणूक जिंका, हा विजयाचा मंत्र दिला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची खजुराहाे येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भूपेंद्रसिंह यादव, वीरेंद्र खटीक इत्यादी नेते उपस्थित हाेते. शाह यांनी सागर भागातील २६ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले की, घराेघरी जा, लाेकांच्या भावना जाणून घ्या. तिकीट न मिळाल्यामुळे काेणीही नाराज नाही. एक-दाेन दिवसांचा प्रश्न आहे. सर्वांची नाराजी दूर हाेईल. एकत्रपणे पक्षासाठी काम करु, असे शाह यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितले.

‘जातिनिहाय जनगणनेचा काॅंग्रेसला फायदा नाही’

जातिनिहाय जनगणनेची मागणी केल्यामुळे काॅंग्रेसला निवडणुकीत काेणताही फायदा हाेणार नाही, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. या पक्षाने सत्तेत असताना कधीही अशी जनगणना केली नाही, हे जनता जाणून आहे. केवळ ओबीसी नव्हे, तर सर्वच जातीच्या लाेकांची जनगणना व्हायला हवी, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Amit Shahअमित शाह