शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास, संपूर्ण जगाला भारताचा अभिमान - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 21:25 IST

ग्वाल्हेर किल्ल्यावर असलेल्या सिंधिया शाळेच्या १२५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.

ग्वाल्हेर : देश आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. हे पूर्णपणे अभूतपूर्व आहे. आपल्या देशाचा संपूर्ण जगाला अभिमान आहे. २३ ऑगस्ट रोजी आपला देश चंद्रावरील अशा ठिकाणी पोहोचला, जिथे आजपर्यंत कोणताही देश पोहोचू शकला नव्हता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ग्वाल्हेर किल्ल्यावर असलेल्या सिंधिया शाळेच्या १२५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, "२०१४ मध्ये जेव्हा त्यांना प्रधान सेवकाची जबाबदारी मिळाली, तेव्हा माझ्याकडे दोन पर्याय होते. एकतर केवळ क्षणिक लाभ किंवा दीर्घकालीन विचार करून काम करणे. आमच्या सरकारला १० वर्षे झाली. सरकारने दीर्घकालीन नियोजनाचे निर्णय घेतले. हे निर्णय अभूतपूर्व आहेत. आज देशाचे यश शिखरावर आहे. आपल्या देशाचा संपूर्ण जगाला अभिमान आहे. २३ ऑगस्ट रोजी भारत चंद्रावर अशा ठिकाणी पोहोचला जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचू शकला नव्हता." 

याचबरोबर, याआधी केवळ सॅटेलाइट सरकारद्वारे बनवले जात होते किंवा परदेशातून आणले जात होते, परंतु त्यांच्या सरकारने स्पेस सेक्टरसोबत डिफेन्स सेक्टर तरुणांसाठी खुले केले आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, तरुणांना मेक इन इंडियाचा संकल्प घेऊन पुढे जाण्याचे आणि नेहमी चौकटीबाहेरचा विचार करण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले. याशिवाय, भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी आहे. आज जागतिक फिनटेक अॅडॉप्शन रेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. गगनयानच्या क्रू एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. आज देशासाठी काहीही अशक्य राहिलेले नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

गरीबी दूर होईल आणि देश विकसित बनेलकेंद्र सरकारच्या योजनांचे कौतुक करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, गरिबीला दूर करुन आपला देश विकसित होईल. आज भारत सर्व काही मोठ्या प्रमाणावर करत आहे. स्वप्ने आणि संकल्प दोन्ही मोठे असली पाहिजे. तुमचे स्वप्न खरंतर माझा संकल्प आहे. जेथे संधींची कमतरता नाही, असे वातावरण निर्माण केले पाहिजे. तरुणांच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. या सर्वांचा दृढनिश्चय यशाकडे नेईल. येणारी २५ वर्षे प्रत्येकासाठी महत्त्वाची आहेत, तितकीच देशासाठीही महत्त्वाची आहेत. तसेच, आमच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतल्याचेही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेश