शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

'तेरे नाम' च्या सलमानसारखं PM नरेंद्र मोदी रडतात; प्रियंका गांधींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 18:49 IST

विश्वासघात बऱ्याच लोकांनी केलाय, परंतु शिंदे यांनी ग्वाल्हेर आणि चंबलच्या जनतेसोबत विश्वासघात केलाय असं प्रियंका गांधींनी टीका केली.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात गब्बर, जय-वीरूनंतर अमिताभ बच्चन आणि असरानी यांच्यानंतर आता सलमान खानच्या राधेची एन्ट्री झाली आहे. राजकीय नेते एकमेकांवर कुठल्या ना कुठल्या आरोपांचा वापर करत अनेकदा बॉलिवूड एक्टर्स आणि सिनेमातील कॅरेक्टरनं संबोधत आहेत. आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी निवडणुकीच्या मैदानात सलमान खानसह अमिताभ आणि असरानी यांचे नाव जोडले.

प्रियंका गांधींनी पंतप्रधान मोदींवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, मोदींबाबत काही विचारू नका, ते देशातील एकमेव असे पंतप्रधान आहेत जे नेहमी त्यांच्याच दुखण्यासाठी त्रस्त असतात. कर्नाटकात गेले, तिथे शिव्या ऐकवल्या. मध्य प्रदेशात आले तरी शिव्या मोजल्या. पंतप्रधान मोदी नेहमी रडत असतात. सलमान खानचा सुपरहिट सिनेमा तेरे नामचा उल्लेख करतात जसं सलमान खान सिनेमात सुरुवातीपासून शेवटपर्यंत रडत होते. तसेच मोदी रडत राहतात. तसेच पंतप्रधान मोदींवरही एक सिनेमा बनवायला हवा. ज्याचे नाव मेरे नाम ठेवावं लागेल अशी खिल्ली उडवली.  

मध्य प्रदेश निवडणूक प्रचारासाठी प्रियंका गांधी या दतियाला पोहचल्या होत्या. ज्याठिकाणी एका जाहीर सभेला संबोधित करताना प्रियंका गांधींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलीत भाजपावर जोरदार निशाणा साधला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, मी ज्योतिरादित्य शिंदेंसोबत उत्तर प्रदेशात काम केलंय. उंचीत शिंदे भलेही छोटे असले तरी अहंकारात वाह भाई वाह..मला महाराज, वहाराज बोलण्याची सवय नाही. परंतु मध्य प्रदेशात जे येतात ते त्यांना महाराज बोलतात. विनामहाराज काम होत नाही असं लोक म्हणायचे. शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबाची परंपरा चांगली जोपसली आहे असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, विश्वासघात बऱ्याच लोकांनी केलाय, परंतु शिंदे यांनी ग्वाल्हेर आणि चंबलच्या जनतेसोबत विश्वासघात केलाय. त्यांनी जनतेच्या पाठित खंजीर खुपसला. राज्यात बनलेले सरकार पाडले. ज्या सरकारला जनतेने मते देऊन निवडून आणले होते. तर शिवराज सिंह चौहान हे जागतिक प्रसिद्ध अभिनेता आहेत. शिवराज सिंह एक्टिंगमध्ये अमिताभ बच्चनलाही मात देतील. परंतु कामाची गोष्ट कराल तर शिवराज असरानी यांच्या भूमिकेत येतात असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३