शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! मुलीला जन्म देताच महिला न्यायाधीशाचा मृत्यू; नवजात बालकाचे छत्र हरपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 18:50 IST

मुख्य न्यायदंडाधिकारी पद्मा राजोरा यांचे प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने निधन झाले.

मध्य प्रदेशातील खरगोन येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मुख्य न्यायदंडाधिकारी पद्मा राजोरा यांचे प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्याला एक मूल असावं अशी त्यांची इच्छा होती पण दुर्दैवाने मुलीचे तोंडही न पाहता त्यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी आयव्हीएफ तंत्राद्वारे नवजात मुलीला जन्म दिला. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्या चार दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी लढत होत्या पण अखेर त्यांचा मृत्यू झाला.

महिला न्यायाधीशांच्या निधनाची बातमी समजताच वकील आणि नातेवाईकांनी तीव्र शोक व्यक्त केला. वकिलांनी सांगितले की, पद्मा या मागील तीन वर्षांपासून खरगोनमध्ये तैनात होत्या. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती ठीक नसल्याने ८ जानेवारी रोजी त्यांनी रजा घेतली. त्यानंतर दोन दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र त्यानंतर त्यांना येथून इंदूरला रेफर करण्यात आले. मात्र, त्यांनी खरगोनमध्येच नवजात बाळाला जन्म दिला होता आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती.

नवजात बालकाचे छत्र हरपलंदरम्यान, ५१ व्या वर्षी प्रसूती, अशक्तपणा आणि कावीळ यामुळे त्यांची प्रकृती ढासळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९७३ रोजी झाला. त्या इंदूर येथील रहिवासी होत्या. न्यायालयीन कर्मचारी सांगतात की, १४ जुलै २०२१ रोजी सीजेएम न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. महिला न्यायाधीश पद्मा राजोरे आपल्या कामाबद्दल जागरूक होत्या आणि गरोदरपणातही त्या कोर्टात येत होत्या. पद्मा राजोरे यांनी जवळपास ९ महिनेच काम केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मा यांनी खरगोन येथेच मुलीला जन्म दिला पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना इंदूरला रेफर करण्यात आले तिथे त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू