शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हरची लायकी काढणारे जिल्हाधिकारी अडचणीत, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी कारवाई   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 12:45 IST

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील शाजापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी, ड्रायव्हर आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकाची लायची काढल्याने प्रकरण चिघळले होते.

केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात देशभरातील ट्रकचालकांनी संप पुकारला होता. त्याचा परिणाम देशातील बहुतांश मालाच्या दळणवळणावर झाला होता. दरम्यान,  मध्य प्रदेशमधील शाजापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी, ड्रायव्हर आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकाची लायची काढल्याने प्रकरण चिघळले होते. दरम्यान, या जिल्ह्याधिकाऱ्यांवर आता मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री मोहन यादव यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

शाजापूर येथे घडलेल्या या घटनेबाबत कारवाई करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांन संबंधित जिल्ह्याधिकारी किशोर कन्याल यांना पदावरून हटवले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं की, हे सरकार गरिबांचं आहे. सर्वांच्या कामाचा सन्मान झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गरिबांची सेवा करत आहोत. मानवतेच्या भावनेतून अशी भाषा आमचं सरकार सहन करणार नाही. मी स्वत: मजूर कुटुंबातील मुलगा आहे. अशी भाषा वापरणं योग्न नाही. अधिकाऱ्यांना भाषा आणि व्यवहारावर लक्ष ठेवावं.

काल झालेल्या बैठकीवेळी   जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच, नीट समजावून सांगा, असेही तो म्हणाला. त्यावर, जिल्हाधिकाऱ्यांना राग अनावर झाला. त्यांनी ड्रायव्हरला सुनावले. यामध्ये चुकीचं काय आहे?, समजतो काय स्वत:ला, काय करणार तू, तुझी लायकी काय? असं विधान त्यांनी केलं होतं.

त्यानंतर ड्रायव्हरनेही तितकंच परखड उत्तर दिलं. तो म्हणाला. हीच तर आमची लढाई आहे की, आमची काहीच लायकी नाही. त्यावर, कलेक्टर म्हणाले की, लढाई अशी असू शकत नाही. कृपया तुम्ही कायदा हातात घेऊ नका, तुमच्या सर्व अडचणी ऐकण्यासाठीच तुम्हाला इथं बोलावलं आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रागावल्याने बैठक काही वेळेसाठी स्थगित करण्यात आली. त्यानंतर, ड्रायव्हरने माफीही मागितली. तर, जिल्हा प्रशासनानेही आंदोलन शांतीपूर्ण पद्धतीने करा, कुठलाही हिंसाचार करू नका, असे आवाहन ड्रायव्हर्संना केले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीGovernmentसरकार