शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्वतः ऑटो चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला, डॉक्टरांसमोर तरुणाने जीव सोडला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 15:17 IST

डॉक्टर तपासत होते, तेवढ्यात तरुणाला आला Heart Attack; जागीच मृत्यू

Herat Attack : गेल्या काही काळापासून व्यायाम करताना, धावताना, क्रिकेट खेळताना आणि डान्स करताना हर्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यूच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या घटनांचे अनेक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तरुणाचा चक्क डॉक्टरसमोर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये चेकअपसाठी डॉक्टरकडे गेलेल्या रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मृत्यूचा व्हिडिओ कैद झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सोनू मतकर(वय 31 वर्षे) असे या तरुणाचे नाव असून, रविवारी रात्री ही घटना घडली आहे.

पोलिसांनी सांगितले की, ऑटो चालक सोनू मतकर छातीत दुखत असल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेला होता. तो डॉक्टरांसमोर बसला, डॉक्टरांनी त्याची तपासणी सुरू केली, तेवढ्यात अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलMadhya Pradeshमध्य प्रदेश