शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"माझी जनता भिजतेय मग मी...", भरपावसात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा जनतेशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 19:43 IST

CM Shivraj in Morena : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचेमुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीला फार कालावधी उरला नसून राज्यातील सत्तेची कमान राखण्यासाठी सत्ताधारी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणजे भाजपाने जनतेपर्यंत पोहचण्यासाठी सुरू केलेली जनआशीर्वाद यात्रा. ही यात्रा आता मुरैना येथे पोहोचली असून इथे जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांनी भरपावसात भाषण केले. 

पावसात भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझी माणसं भिजत असतील तर मी देखील भिजत सभा घेईन. मग पावसात भिजत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान अनेक महिला मंचाजवळ आल्या आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. तसेच जौरा नगर पंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर करण्याची घोषणा करून जौरावासीयांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. 

भरपावसात घोषणांचा पाऊसयावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, आमच्या मुलांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम शिकायचे आहे, आम्ही त्यांना कंपनीत काम शिकवू आणि दरमहा ८ हजार रूपये स्टायपेंडही दिला जाईल. तुम्ही सर्व जण कुटुंबासारखे आहात. तुमच्या समस्या दूर करून तुमच्या जीवनात सुधारणा घडवून आणणे हे आमचे कर्तव्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारइतके रस्ते काँग्रेसने कधी बांधले होते का? कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक केली. पण, भाजपा सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांचे २२०० कोटी रुपयांचे व्याज भरले.

दरम्यान, शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा होतील, जे प्रत्येकी २ हजार रुपयांच्या हप्त्याने जमा केले जात आहेत. माता-भगिनींना पूर्वी १००० रुपये दिले जात होते, आता मी ते १२००, १५००, १७५० आणि २२०० रुपयांवरून ३००० रुपये करणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानChief Ministerमुख्यमंत्री