शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना स्कूटी अन् ४५० रुपयांत मिळणार गॅस; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 20:59 IST

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. आज मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली. आता केवळ उज्ज्वला योजनेतील लोकांनाच नाही तर उज्ज्वला योजनेत नसलेल्या लोकांनाही कायमस्वरूपी ४५० रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, भाजपाची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी बडवाह विधानसभा मतदारसंघात पोहचली. यावेळी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी रोड शो करत जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर चाललेल्या रोड शोनंतर मुख्यमंत्र्यांचा रथ कृषी उत्पन्न बाजार संकुलात पोहोचला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहिती त्यांनी सर्वसामान्यांना दिली. तसेच १० तारखेचा दिवस बहिणींच्या आयुष्यात बदल घडवणारा आहे, असे त्यांनी नमूद केले. 

प्रत्येक शाळेतील ३ मुलांना मिळणार स्कूटी मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहिलेल्या लोकांना लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच आता ६० टक्के गुण मिळविणाऱ्या मुला-मुलींना देखील लॅपटॉप दिले जातील. प्रत्येक शाळेतील तीन मुलांना स्कूटीही दिली जाणार आहे. 

निवडणुकीपूर्वी घोषणांचा पाऊस  "आमच्या मुलांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम शिकायचे आहे, आम्ही त्यांना कंपनीत काम शिकवू आणि दरमहा ८ हजार रूपये स्टायपेंडही दिला जाईल. तुम्ही सर्व जण कुटुंबासारखे आहात. तुमच्या समस्या दूर करून तुमच्या जीवनात सुधारणा घडवून आणणे हे आमचे कर्तव्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारइतके रस्ते काँग्रेसने कधी बांधले होते का? कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक केली. पण, भाजपा सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांचे २२०० कोटी रुपयांचे व्याज भरले", असेही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानChief Ministerमुख्यमंत्री