शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देऊ : पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 11:28 IST

१७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशातील दमोह शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच ठेवणार असल्याचेही सांगितले.

दमोह : माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशातील दमोह शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच ठेवणार असल्याचेही सांगितले. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये लोकांनी काँग्रेसला सत्ता दिली; पण त्यांचे मुख्यमंत्री सट्टेबाजी आणि काळा पैसा निर्माण करण्यात गुंतलेले आढळले, असे ते म्हणाले. 

 मोदी म्हणाले की, २०१४ नंतर देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर गेली. २०० वर्षांपेक्षा जास्त काळ देशावर राज्य करणाऱ्या यूकेला मागे टाकले. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास राज्यांमध्ये ८५ टक्के कमिशन मशीन काम करेन. माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की, केंद्राने जाहीर केलेल्या प्रत्येक एक रुपयापैकी केवळ १५ पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात. दरम्यान, गरीब लोकांसाठी मोफत रेशन योजना पाच वर्षांपर्यंत वाढवण्याच्या आश्वासनाबाबत काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. 

नितीशकुमार यांच्यावर नाव न घेता केली टीका  गुना : इंडिया आघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने विधानसभेत महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरली; परंतु, विरोधी गटाच्या घटकांनी एक शब्दही उच्चारला नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान म्हणाले की, अशी दृष्टी असलेले लोक तुमचा सन्मान आणि आदर कसा ठेवतील? केंद्रात भाजपच्या १० वर्षांच्या काळात मध्य प्रदेश सरकारचा राज्याचा अर्थसंकल्प ८०,००० कोटी रुपयांवरून तीन लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी पुरेसा निधी दिला नाही. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी