शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक! सरकार येताच श्रीलंकेत सीता मंदिर बांधणार; कमलनाथ यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 19:35 IST

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष घोषणांचा पाऊस करत आहेत.

Kamal Nath Promises for MP Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष घोषणांचा पाऊस करत आहेत. विविध कामांचे आश्वासन देऊन जनतेला आकर्षित करण्यासाठी राजकीय नेतेमंडळी मैदानात आहे. २०२३च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ दररोज जनतेसमोर आश्वासनांची यादी वाचत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळत काँग्रेसचे सरकार आल्यास श्रीलंकेतील सीता माता मंदिराच्या उभारणीची योजना पुन्हा सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले.

खरं तर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील मागील कॉंग्रेस सरकारने श्रीलंकेत माता सीतेचे मंदिर बांधण्याची योजना आखली होती, परंतु ते सुरू होण्यापूर्वीच राज्यातील सत्तेतून कॉंग्रेस पायउतार झाली. सत्ताबदल होताच योजनेला ब्रेक लागला. त्यामुळे आता सरकार परत येताच श्रीलंकेतील सीता माता मंदिराच्या उभारणीचा प्रकल्प पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन कमलनाथ यांनी पुन्हा दिले आहे. कॉंग्रेसची मोठी आश्वासने विजयादशमीच्या निमित्ताने कमलनाथ यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली. कोणताही भाविक देवाच्या दर्शनापासून वंचित राहू नये यासाठी मंदिरांमधील दर्शनासाठी असलेली तिकीट व्यवस्था हटवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय भगवान परशुरामांचे जन्मस्थान असलेल्या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. एवढेच नाही तर अस्थिकलशाचे विसर्जन आणि कुटुंबीयांच्या अंत्यसंस्कारासाठी दहा हजार रुपयांची मदत दिली जाईल, असा दावा त्यांनी केला. 

तसेच पुजारी आणि महंतांचा विमा काढला जाईल. महाकाल आणि ओंकारेश्वर मंदिरात सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जाईल. श्रद्धास्थानांची देखभाल आणि त्यांच्याशी संबंधित पुजारी आणि सेवकांचे जीवनमान लक्षात घेऊन आम्ही प्रचलित नियमांमध्ये सुधारणा करू. रेवा येथे संत कबीर पीठ आणि मुरैना येथे संत रविदास पीठ बांधून देऊ, असेही कमलनाथ यांनी आश्वासन देताना सांगितले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस