शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टा फ्रेंडने केलं विवाहितेचं आयुष्य उद्ध्वस्त, बलात्कार करून तिच्या पतीला पाठवले व्हिडीओ, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 18:27 IST

Crime News: इन्स्टाग्रामवर मित्र बनलेल्या एका तरुणाने एका नवविवाहितेचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इन्स्टाग्रामवर मित्र बनलेल्या एका तरुणाने एका नवविवाहितेचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ग्वाल्हेर येथील एका २१ वर्षांच्या विवाहितेची इन्स्टाग्रामवर दिल्लीतील एका तरुणाशी ओळख झाली होती. या तरुणाने तिला भेटण्यासाठी दिल्लीला बोलावले. त्यानंतर हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या दरम्यान, त्याने त्या विवाहितेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. तसेच ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेगवेगळ्या शहरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नाही तर आरोपी विवाहितेला ब्लॅकमेल करू लागला. अखेर कंटाळून विवाहितेने पोलिसांकडे तक्रार दिली. तसेच आता पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

ग्वाल्हेरमधील थाटीपूर परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय विवाहितेने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तिने सांगितले की, सुमारे वर्षभरापूर्वी तिचा विवाह झाला नव्हता. तेव्हा इन्स्टाग्रामवर तिची ओळख हरियाणामधील पलवल येथील रहिवासी असलेल्या दीपक जाटव याच्याशी झाली. मैत्री झाल्यानंतर दोघांमध्ये नियमितपणे बोलणं होऊ लागलं. याचदरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न लावून दिलं. त्यानंतर १४ मे रोजी दीपक याने तिला भेटण्यासाठी दिल्लीला बोलावलं. तेव्हा ही तरुणी पतीला काही न सांगता दीपकला भेटण्यासाठी दिल्लीमध्ये आली. तिथे दीपकने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. दीपकने जवळपास आठवडाभर आपल्यासोबत ठेवले. तसेच तिच्यावर वारंवार बलात्कार केला. 

त्यानंतर दीपकने जून महिन्यात तिला पुन्हा एकदा भेटण्यासाठी बोलावले. यावेळीही दीपकने तिला हॉटेलमध्ये थांबवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर जुलै महिन्यात दीपकने विवाहितेला फोन करून पैशांची मागणी केली तसेच तिल्या धमक्या दिल्या. विवाहितेने दीपकला सांगितले की, तिच्याकडे पैसे नाही आहेत. त्यावर दीपकने विवाहितेला तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तेव्हा या तरुणीने आपल्याकडील दागिने गहाण ठेवून ३० हजार रुपये घेऊन दीपकला भेटण्यासाठी जयपूरला गेली. तिथेही दीपकने तिच्यावर अत्याचार केले.

त्यानंतर पैशांची भूक वाढलेला दीपक तिच्याकडे वारंवार पैसे मागू लागला. मात्र यावेळी तरुणीने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्याने सर्व व्हिडीओ या महिलेच्या पतीला पाठवले. अखेरीस या तरुणीने ग्वाल्हेरच्या एसपी ऑफिसमध्ये धाव घेत तक्रार दिली. आता पोलिसांनी आरोपी दीपकविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशsexual harassmentलैंगिक छळ