शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 19:54 IST

प्रेयसीने केलेली मागणी पूर्ण करू न शकल्याने एका विवाहित व्यक्तीने मृत्यूला मिठी मारण्याचा प्रयत्न केला.

प्रेयसीने केलेली मागणी पूर्ण करू न शकल्याने एका विवाहित व्यक्तीने मृत्यूला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्याने आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ पत्नीला पाठवून जीवन संपवले. मग पत्नीने माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेतली, पती गंभीर अवस्थेत असल्याचे पाहून तिला धक्का बसला. मग तिने सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या पतीला जवळच्या इस्पितळात नेले. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. रामचरण नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीने प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तो फर्निचर कंपनीत काम करत असे. टोकाचे पाऊल उचलताना रामचरणने व्हिडीओ काढून पत्नीला शेअर केला. त्याने एका महिलेवर आरोप करताना म्हटले की, पिंकी ही महिला मागील काही दिवसांपासून पैशांसाठी मला ब्लॅकमेल करत आहे. मी अनेकदा तिला पैसे दिले. पण, दिवसेंदिवस तिची मागणी वाढत गेल्याने मी वैतागलो. ती आजही माझ्याकडे सहा लाख रुपयांची मागणी करत आहे. 

पत्नीला व्हिडीओ शेअर करताना संबंधित व्यक्तीने आणखी सांगितले की, मी विष प्राशन केले आहे, मला काही झाले तर हा ऑडिओ आणि व्हिडीओ व्हायरल करा जेणेकरून दोषींना शिक्षा होईल. यानंतर रामचरणची पत्नी चमन हिने लगेच संबंधित ठिकाणी पोहोचून पतीला जिल्हा रुग्णालयात नेले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर रामचरणवर उपचार करत आहेत मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

...अन् रामचरणने संपवले जीवनरामचरणची पत्नी चमनने सांगितले की, रामचरण सकाळी कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. यानंतर रात्री मित्राने फोनवर रामचरणने विष प्राशन केल्याचे सांगितले. मग त्याच्या मोबाइलमधील व्हिडीओ आणि ऑडिओ पाहिल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याने बनवलेला व्हिडीओ आणि ऑडिओ पोलिसांच्या हवाली केला. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, रामचरणने व्हिडीओमध्ये ज्या मुलीचे नाव सांगितले आहे तिचा शोध सुरू आहे.

सुसाईड नोटमध्ये रामचरण पत्नी चमन जाटव हिला पिंकी दास ही महिला सतत त्रास देत असल्याचे सांगतो. तिने मला ६ लाख रुपये दे नाहीतर तुरुंगात जाण्यास तयार राहा, अशी धमकी दिली आहे. ती मला वारंवार कॉल करते आणि जेव्हा मी फोन उचलत नाही, तेव्हा ती मला मेसेज पाठवते, जे माझ्या फोनच्या मेसेज बॉक्समध्ये असतात. यावर माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. तिचे रेकॉर्डिंग माझ्या फोनमध्ये आहे. पिंकी, तिची आई आणि भावाने मिळून अनेकांना उद्ध्वस्त केले आहे आणि भविष्यातही ते करत राहतील. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट