शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज रिंगणात, शिवराज सिंह यांचा रस्ता काटेरी; तिसऱ्या यादीतही नाव नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 09:51 IST

भाजपच्या तिसऱ्या यादीतही नाव नाही

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तीन केंद्रीय मंत्री व चार खासदारांना मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची रणनीती ही कोणत्याही किमतीवर राज्यातील सत्ता वाचवण्याचेच संकेत देत आहे. आतापर्यंत उमेदवारांच्या तीन यादीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव नसल्याने त्यांच्यासाठी पुढचा रस्ता काटेरी आहे, कारण भावी मुख्यमंत्र्यांच्या रूपात त्यांना प्रोजेक्टही केले जाणार नाही.

मध्यप्रदेशात सर्वाधिक काळ राज्य करणारे मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांचे नाव घेतले जाईल. ते सुमारे १८ वर्षे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते; परंतु भाजप त्यांना येथेच रोखू इच्छित आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गन सिंह कुलस्ते आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा सरळ अर्थ असा आहे की, आता यापुढे मध्यप्रदेशातील राजकारणाची सूत्रे शिवराज सिंह चौहान यांच्या हाती असणार नाहीत. भावी मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही एका नेत्याला प्रोजेक्ट करण्याऐवजी भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणुका लढवणार आहे. 

यापूर्वीही केला प्रयोगn भाजप नेत्यांचा दावा आहे की, केंद्रीय मंत्री व खासदारांसारख्या दिग्गज नेत्यांना निवडणुकीत उतरवण्याचे काम भाजपने यापूर्वीही केले होते; तेच यावेळीही केले आहे.n यूपीत  अखिलेश यादव यांच्या विरोधात भाजपने मंत्री एसपीएस बघेल यांना तिकीट दिले होते.n सोनिया गांधी यांच्याविरोधात दिवंगत सुषमा स्वराज यांना रिंगणात उतरवले होते. n दिवंगत माधवराव सिंधिया यांच्या विरोधात १९८४ मध्ये ग्वाल्हेरमधून दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी निवडणूक लढवली होती.n कमलनाथ यांच्या विरोधात भाजपने छिंदवाडा येथून माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.n त्रिपुरात केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांनी निवडणूक लढविली.

लढण्यावर साशंकतामुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव भाजपने घोषित केलेल्या आतापर्यंतच्या तीन याद्यांतील ७९ नावांमध्ये आलेले नाही. याचा अर्थ स्पष्ट समजला जात आहे की, भाजप त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू इच्छित नाही.

 

 

टॅग्स :BJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानElectionनिवडणूक