शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी गैरहजर! पण वडिलांची चप्पल मागण्यासाठी करोडपती लेक वृद्धाश्रमात पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 16:29 IST

सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही.

सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. हास्यास्पद तितक्याच संतापजनक घटना समोर येत असतात. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना सर्वांना थक्क करुन जातात. अशीच एक संतापजनक घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली. येथे वृद्धाश्रमात जाण्यासाठी व्यग्र असलेल्या व्यक्तीने जे केले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. आपले पालक वर्षभरापूर्वी मरण पावले असल्याचे माहिती असताना तो अंत्यदर्शनासाठी आला नाही. पण, आता गरज भासताच त्याने वृद्धाश्रमाचा दरवाजा ठोठावला.

दरम्यान, भोपाळच्या आसरा वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापक राधा चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वृद्धाश्रमात दरवर्षी पितृ पक्षाच्या काळात ही परिस्थिती पाहायला मिळते. अनेकजण आपल्या पालकांची आठवण सांगत इथे येत असतात. या १५ दिवसांत लोक मोठ्या थाटामाटात येतात आणि त्यांच्या आई-वडिलांची विचारपूस करतात. त्यांच्या आई-वडिलांची एखादी आठवण असल्यास द्यावी अशी मागणी ते करत असतात.

अंत्यसंस्कारासाठी गैरहजर पण... मृतांच्या आठवणी, निशाणी किंवा एखादी वस्तू त्यांच्या वारसाला दिली जाते. संस्थेतर्फे संबंधित मृत व्यक्तींच्या घरच्यांना तशी कल्पना दिली जाते. मात्र, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तेच वंशज आहेत जे आपल्या आई-वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी देखील आले नव्हते. त्यावेळी आश्रमातर्फे ज्येष्ठांचे अंतिम संस्कार करण्यात आले. आता इतक्या वर्षांनंतर लोकांना आपल्या आई-वडिलांची आठवण आली आणि ते हे आठवणी सांगत आहेत. एक वर्षापूर्वी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. आता त्यांचा मुलगा इथे चप्पल मागायला आला आहे, असेही राधा चौबे यांनी सांगितले.

माझे वडील स्वप्नात येतात... ते माझ्याकडे चप्पल मागतात, अशी मागणी करत एक व्यक्ती आश्रमात आला. अनेक जण आजारपणाची किंवा मृत्यूची माहिती मिळाल्यावर केवळ अंत्यसंस्कारासाठी पैसे खर्च करावे लागतील म्हणून आपल्या वडिलधाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. किंबहुना त्यांना भीती वाटते की मृत आत्मा त्यांना त्रास देऊ शकतो, असेही वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी सांगितले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSocial Mediaसोशल मीडिया