शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून नवनवीन कारणे, 5 दिवसांत आले 500 अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 20:03 IST

या कर्मचाऱ्यांकडून अर्जामध्ये अशी एकापेक्षा एक कारणे दिली जात आहेत की, ती पाहून वाचकांचीही करमणूक होत आहे.

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणूक ड्युटीपासून लांब राहण्यास प्राध्यान्य देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात अर्ज प्रशासनाकडे पोहोचू लागले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून अर्जामध्ये अशी एकापेक्षा एक कारणे दिली जात आहेत की, ती पाहून वाचकांचीही करमणूक होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच निवडणूक ड्युटीतून वगळण्यासाठी अनके कर्मचाऱ्यांचे अर्ज प्रशासनाकडे येऊ लागले आहेत. यामध्ये विविध कारणे नमूद करण्यात आली आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमधील व्यवस्थापक स्तरावरील एका अधिकाऱ्याने तर अजबच कारण दिले आहे. या अधिकाऱ्याने आपल्या अर्जात "माझी अचानक स्मरणशक्ती कमी झाली असून दोन तास येत नाही. अशा स्थितीत निवडणूक कर्तव्य कसे पार पाडता येईल? असा सवाल केला आहे. दरम्यान, प्रशासनाने त्यांचा अर्ज मेडिकल बोर्डाकडे पाठवला आहे.

दुसरीकडे, लष्कर सर्कलमधील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने निवडणूक ड्युटी लावली जाऊ नये, यासाठी आपल्या अर्जात म्हटले आहे की, "माझे हिमोग्लोबिन कमी आहे. जेव्हा ते अप-डाऊन होते, तेव्हा मला कधीही चक्कर येते. यामुळे मी 30 ते 40 मिनिटे बेशुद्ध होते. अशा परिस्थितीत मी निवडणूक ड्युटी कशी करू शकते?".

5 दिवसांत 500 हून अधिक अर्ज गेल्या 9 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून अवघ्या 5 दिवसांत असे 500 हून अधिक अर्ज प्रशासनाकडे पोहोचले आहेत. त्यापैकी एकूण 130 अर्ज असे आहेत की, त्यात निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी अजब कारणे देण्यात आली आहेत. तसेच, 60 अर्ज शिक्षण विभागाचे असून, ते निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी देण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या अर्जामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच हे अर्ज निवडणूक ड्युटी टाळण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे.

अनेकजण थेट अर्जच घेऊन येत आहेत...विधानसभा निवडणुकीत ड्युटीतून दिलासा मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी ग्वाल्हेर यांनी जिल्हा पंचायत सीईओंना निवडणूक ड्युटीतून सूट देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. निवडणूक ड्युटीतून मुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. अनेकजण थेट अर्ज घेऊन येत आहेत. निवडणुकीत असे अर्ज देत असताना उरलेल्या दिवसांत कोणते सरकारी काम ते करू शकणार, याचाही गांभीर्याने विचार अधिकारी करत आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशEmployeeकर्मचारी