शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"एवढं तर मीही बोलू शकत नाही"; ललिता यांचा संवाद ऐकून मोदीही अवाक्, एकच हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 18:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम-जनमन कार्यक्रमांतर्गत आदिवासी महिलांसोबत संवाद साधला

मुंबई - केंद्र सरकारच्या विविध योजना गावखेड्यात पोहोचल्या पाहिजेत यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात शासन आपल्या दारी हा उपक्रमक राज्य सरकारने राबवला असून त्या माध्यमातून लाभार्थींना सरकारी योजनांचा लाभ दिला जात आहे. तर, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारही गावखेड्यात पोहोचत आहे. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गावागावातील, आदिवासी पाड्यातील योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला. महिला व विद्यार्थ्यांसोबतही मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी, मध्य प्रदेशातील ललित यांच्यासोबत संवाद साधताना मोदींनाही हसू आले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम-जनमन कार्यक्रमांतर्गत आदिवासी महिलांसोबत संवाद साधला. यावेळी, पीएम आवास योजना - ग्रामीण भागातील १ लाख लाभार्थींना पहिला हफ्ता बँक खात्यात जमाही केला. तसेच, लाभार्थी महिलांसोबत थेट मोदींनी संवाद साधला. येथे ललिता नामक महिलेशी संवाद साधताना महिलेनं त्यांच्या कुटुंबीयांस मिळालेल्या लाभाची माहिती दिली.

पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारच्या योजनेतील लाभार्थी महिला ललिता आदिवासी यांच्याशी संवाद साधताना, तुमच्याबद्दल माहिती द्या, असा प्रश्न केला होता. त्यावर, संबंधित महिलेनं स्वत:बद्दल, स्वत:च्या कुटुंबाबद्दल आणि सरकारकडून मिळालेल्या योजनांच्या लाभाबद्दल माहिती दिली. यावेळी, ललिता यांनी अगदी पाठांतर केल्याप्रमाणे एकामागून एक अशी योजनांची व मिळालेल्या लाभाची माहिती दिली. मला तीने मुले असून मोठी मुलगी इयत्ता ६ वीमध्ये शिकत आहे. तिला शिष्यवृत्ती आणि ड्रेस मिळत असून सुकन्या समृद्धी योजनेत तिच्या नावे दरमहा २५० रुपये टाकले जात आहेत. लाडली लक्ष्मी योजनेचाही तिला लाभ मिळत आहे. माझा दुसरा मुलगा दुसरी इयत्तेत असून त्यालाही ड्रेस व मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळतो. तिसरा मुलगा अंगणवाडीत शिक्षण घेत आहे, असे ललिता यांनी मोदींना सांगितले.  बचत गटाशीही आम्ही जोडले गेलो आहोत, या बचत गटाच्या माध्यमातून गौशाळा चालवण्याचं काम आम्हाला मिळालं आहे, अशी माहिती ललिता यांनी दिली. ललिता यांच्या या संवादानंतर बोलताना मोदींनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. ललिताजी तुम्ही तर सुपरफास्ट एकापाठोपाठ एक सांगत आहात, एवढं तर मीही बोलू शकत नाही, असे मोदींनी म्हणताच सर्वत्र हशा पिकला. 

दरम्यान, पालघर जिल्ह्यातही प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (पीएम-जनमन) योजनेच्या माध्यमातून आज लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी, पंतप्रधान मोदींनी आदिवासी महिला भगिनींशी संवाद साधला. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाpalgharपालघरHomeसुंदर गृहनियोजन