शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मध्य प्रदेशात 93 आमदारांवर फौजदारी गुन्हे, 186 करोडपती; ADR च्या अहवालात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 19:03 IST

या अहवालानुसार, एकूण 230 आमदारांपैकी 93 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, तर 186 आमदार करोडपती आहेत.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर)  आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे नेते प्रचंड नाराज आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या महिनाभर आधी या अहवालात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. या अहवालात गुन्हेगारी, बेहिशेबी संपत्ती आणि साक्षरता याबद्दल सांगण्यात आले आहे. या अहवालानुसार, एकूण 230 आमदारांपैकी 93 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, तर 186 आमदार करोडपती आहेत.

या अहवालातील सर्वात मोठा खुलासा आमदारांच्या गुन्हेगारी रेकॉर्डवर झाला आहे. मध्य प्रदेशातील एकूण 230 आमदारांपैकी 93 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. गंभीर गुन्हे केलेले 47 आमदार आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्व राजकीय पक्ष रिंगणात आहेत. काँग्रेस भाजपला आव्हान देत असून यावेळी निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

भाजप आमदारांबद्दल बोलायचे झाले तर 129 आमदारांपैकी 39 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. याचबरोबर, काँग्रेसच्या 97 आमदारांपैकी 52 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. मात्र, काहीवेळा आंदोलन करतानाही राजकीय गुन्हे दाखल होतात, असे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. अहवालानुसार, खुनाशी संबंधित प्रकरणे असलेल्या एका आमदाराने खुनाशी संबंधित प्रकरणे घोषित केली आहेत. तसेच, खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित 6 विद्यमान आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.

230 आमदारांपैकी 186 आमदार करोडपतीआता श्रीमंत आमदारांबद्दल सांगायचे झाल्यास, अनेक आमदार नेहमीच असा दावा करतात की, त्यांच्याकडे पैसे नाहीत, पण या अहवालातून असे समोर आले आहे की, मध्य प्रदेशातील 230 आमदारांपैकी 186 आमदार करोडपती आहेत. यामध्ये काँग्रेसचे 97 पैकी 76 आमदार करोडपती आहेत. संजय शुक्ला हे काँग्रेसचे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. संजय शुक्ला यांची एकूण संपत्ती 139 कोटी रुपये आहे. याचबरोबर, भाजपचे  129 पैकी 107 आमदार करोडपती आहेत. भाजपमधील सर्वात श्रीमंत आमदार संजय पाठक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 226 कोटी रुपये आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMLAआमदार