शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

मध्य प्रदेशात भाजपा नेत्याची हत्या, इंदूरमध्ये भगवा यात्रेची तयारी करत असताना झाला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 13:15 IST

BJP leader Monu Kalyane shot dead in Indore: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू कल्याणे हे मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते.

मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू कल्याणे हे मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते. जुन्या वादामधून पीयूष आणि अर्जुन यांना मोनू कल्याणे याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोघ घेत आहेत. 

इंदूरमधील विधानसभा क्रमांक ३ च्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या मोनू कल्याणे यांना कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आणि माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय मानले जात असे. गोळी लागल्यानंतर मोनू कल्याणे यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात आणले. मात्र तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मोनू कल्याणे हे इंदूरमध्ये भगवा यात्रेची तयारी करत होते. त्याचदरम्यान पीयूष आणि अर्जुन नावाचे दोन तरुण दुचाकीवरून चिमणबाग येथे आले. त्यांनी दुचाकीवरूनच मोनू यांच्याशी चर्चा केली. त्याचदरम्यान, दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुन याने पिस्तूल काढत मोनूवर धडाधड गोळ्या झाडल्या. त्यानंतर हे दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. आरोपींनी चिमणाबाग येथील चौकात उभ्या असलेल्या मोनूच्या मित्रांवरही गोळीबार केला, मात्र सुदैवाने ते बचावले. दरम्यान, हत्येच्या घटनेनंतर कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश वियवर्गीय यांनी आपल्या समर्थकांसह मोनू यांच्या घरी धाव घेत त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी