शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

AAP च्या नगरसेवकाला महिलांची भररस्त्यात चपलाने मारहाण; लाच मागितल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 17:58 IST

प्रधानमंत्री आवास योजनेतील हप्ता मिळवून देण्यासाठी प्रत्येकी रु. 10 हजारांची लाच मागितल्याचा आरोप.

AAP News: मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) नगरसेवकाला प्रभागातील महिलांनी भर बाजारपेठेत मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्रभागातील अर्धा डझन महिलांनी पालिकेबाहेर त्या  नगरसेवकाला घेराव घालून बेदम मारले. दरम्यान, नगरसेवकाने जीव वाचवत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्या महिलांविरोधात गुन्हा दाखल केला. नगरसेवकाच्या सांगण्यावरुन 2 महिलांसह 4 जणांविरुद्ध मारहाणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षातून निवडून आलेले प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक जुगल मेहरा यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील हप्ता मिळवून देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या घटनेनंतर नगरपालिकेतील भ्रष्ट नगरसेवकाची शहरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. नगरपालिकेचा ‘विकास भारत संकल्प यात्रे’चा कार्यक्रम संपल्यानंतर नगरसेवक जुगल मेहरा यांना महिलांनी घेराव घातला आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलांनी नगरसेवकाचे शर्ट पकडून ओढले, नंतर चप्पल आणि गालात चापटा मारल्या. यावेळी उपस्थित लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही केला. 

महिलांचे आरोप बिनबुडाचे : नगरसेवकदरम्यान, नगरसेवक जुगल मेहरा यांनी लाच मागितल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. माझ्याविरुद्ध कट रचला गेला आहे. महिलांनी माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिल्याचा आरोप नगरसेवकाने केला आहे.

टॅग्स :AAPआपMadhya Pradeshमध्य प्रदेशBribe Caseलाच प्रकरण