शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कपडे दिले, समजावलं अन् पोलिसांना बोलावलं; उज्जैनमधील पीडितेसाठी पुजारी बनला 'देवदूत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 15:45 IST

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. १५ वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी अत्याचार केल्यानं संपूर्ण देश हादरला. एवढंच नाही तर आरोपींची क्रूरता एवढी की पीडित तरूणी ८ किलोमीटर नग्न अवस्थेत कपड्यांच्या शोधात फिरत राहिली. पण, दुर्दैव असं की कोणीच तिला आसरा दिला नाही. अखेर तिनं राहुल शर्मा नावाच्या पुजाऱ्याकडं मदत मागितली अन् तो पुजारी तिच्यासाठी देवदूत बनला. राहुल शर्मा हा उज्जैनपासून १५ किमी अंतरावर असलेल्या बडनगर आश्रमात असतो. पीडितेबद्दल बोलताना राहुलनं सांगितलं की, तो आश्रमातून घरी परतत असताना त्याला वाटेत पीडित तरूणी दिसली. तिच्या अर्ध्या शरीरावर कपडे नव्हते. 

अंगावर काटा येणारं दृश्य पाहिल्यानंतर राहुल शर्मानं म्हटलं, "मी मुलीला पाहताच लगेच कपडे देण्यासाठी सरसावलो. तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं. तिला बोलता देखील येत नव्हतं आणि डोळे सुजले होते. मग मी १०० नंबरवर फोन केला. हेल्पलाईन क्रमांकावरून पोलिसांशी संवाद न झाल्यानं महाकाल पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. २० मिनिटांत पोलीस आश्रमाजवळ पोहचले." खरं तर उज्जैनच्या रस्त्यावर तरूणी नग्न अवस्थेत फिरत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

दरम्यान, राहुल शर्माने दाखवलेल्या धाडसामुळे पीडितेला धीर मिळाला. कायदेशीर प्रक्रियेत अडकण्याची पर्वा न करता राहुल शर्मा या पुजाराने तातडीने पोलिसांना बोलावले. उज्जैनमधील या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, पीडित तरूणी ही मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ती तिच्या गावाहून उज्जैनला काही कामासाठी आली होती, पण इथे नराधमांनी तिच्यावर वाईट नजर टाकली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हे सर्व आरोपी ऑटोचालक असल्याचे सांगण्यात येत आहे. राकेश या ३८ वर्षीय चालकालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या रिक्षामध्ये रक्ताचे डाग आढळून आले.

 पुजाऱ्याने सांगितली आपबीती देवदूत पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिला बोलता देखील येत नव्हतं. त्याने तिला नाव विचारले, कुटुंबीयांबद्दल विचारले, तिला इथे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. तो तिची माहिती विचारत होता परंतु ती खूप घाबरली होती. दरम्यान, कोणीही आले तरी ती खूप घाबरायची. पोलिसांना पाहून पीडितेच्या तोंडून शब्द देखील फुटत नव्हता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीArrestअटक