शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या प्रियकराने पुलावरून ढकलले, 13 वर्षांच्या मुलीचा पाईपला लटकून पोलिसांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 07:13 IST

पोलिसांनी सांगितल्यानुसार, मुलीने रात्रीच्या अंधारात पाइपला लटकलेल्या अवस्थेत पँटच्या खिशातून मोबाइल काढून १०० क्रमांकावर फोन केला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता लटकलेल्या मुलीची सुटका केली. 

अमरावती : आईच्या लिव्ह-इन पार्टनरने पुलावरून गोदावरी नदीत ढकलल्यानंतर एका प्लास्टिकच्या पाइपला लटकून १३ वर्षीय मुलीने कसाबसा स्वतःचा जीव वाचविल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशच्या कोनसीमा जिल्ह्यात घडली. तिचे फोटो व्हायरल झालेत. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, मुलीने रात्रीच्या अंधारात पाइपला लटकलेल्या अवस्थेत पँटच्या खिशातून मोबाइल काढून १०० क्रमांकावर फोन केला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता लटकलेल्या मुलीची सुटका केली. 

कीर्तनाने पोलिसांना सांगितले की, रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या आईचा लिव्ह-इन पार्टनर यू. सुरेश याने तिच्यासह आई सुहासिनी (३६) आणि सावत्र बहिण जर्सी(१) यांना पुलावरून ढकलून दिले. शनिवारी सायंकाळी त्याने सर्वांना खरेदीसाठी कारमधून राजा महेंद्रवरमला नेले होते. खरेदीनंतर रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. रावुलापलेम गौथमी ब्रिजवर पोहोचल्यावर सेल्फीसाठी खाली उतरण्यास सांगितले. तो त्यांच्यासोबत पुलाच्या काठावर बसला आणि अचानक त्यांना नदीत ढकलले. 

कीर्तनाची आई, बहीण नदीत वाहून गेले, पण कीर्तना एका प्लास्टिकच्या पाइपला घट्ट पकडून लटकून राहिली. मुलीला बाहेर काढल्यानंतर पाणी देण्यात आले.त्यानंतर तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

दोघींना शोधण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार केली तर दुसरी टीम आरोपीच्या शोधात आहे. दरम्यान, आई-बहीण वाहून गेल्यावरही कीर्तनाच्या धाडसामुळे पोलिसही आश्चर्यचकित झाले होते.

मतभेदामुळे...n गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली येथील सुहासिनी मतभेदांमुळे पतीपासून विभक्त झाली होती. पहिल्या लग्नापासून एक मुलगी (कीर्तना) असलेली ही महिला प्रकाशम जिल्ह्यातील दरसी येथील सुरेशच्या संपर्कात आली. n दोन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. सुरेश आणि सुहासिनीमध्ये नुकतेच मतभेद झाले होते आणि त्याने तिला आणि दोन्ही मुलींना संपवण्याची योजना आखली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी