शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
3
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
4
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
5
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
6
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
7
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
8
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
9
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
10
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
11
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
12
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
13
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
14
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
15
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
16
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
17
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
18
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
19
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
20
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

आई सुरक्षित तर देश सुरक्षित !

By admin | Updated: April 12, 2017 15:08 IST

सुरक्षित मातृत्त्व ही नुसती संकल्पना नसून प्रत्येक आईचा तो अधिकार आहे. 11 एप्रिल हा दिवस प्रत्येक स्त्रीपर्यतं आणि आईपर्यंत हाच संदेश पोहोचवू पाहत आहोत.

‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस’ प्रत्येक आईला आपल्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागृत करत आहे. सुरक्षित मातृत्त्व ही नुसती संकल्पना नसून प्रत्येक आईचा तो अधिकार आहे. 11 एप्रिल हा दिवस प्रत्येक स्त्रीपर्यंत आणि आईपर्यंत हाच संदेश पोहोचवू पाहत आहोत. 11एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात अजूनही प्रसुतीदरम्यान, प्रसुतीनंतर माता मृत्यूचं, अर्भक मृत्यूचं प्रमाण लक्षणीय आहे. त्या पार्शभूमीवर या दिवसाचं महत्त्व म्हणूनच आहे. या दिवसाचं महत्त्व भारतीय समाजात, जनमानसात, गर्भवती स्त्रियांमध्ये रूजावं म्हणून ‘व्हाइट रिबन अलायन्स आॅफ इंडिया’ ही संघटना चळवळीसारखं काम करत आहे.

बाळाच्या जन्माच्या वेळेस स्त्रीची सुरक्षा  हा तिचा मुलभूत हक्क आहे हे ठासून सांगण्याचं काम ही संघटना करत आहे. या संघटनेत जवळजवळ 1800 संस्था एकत्र आलेल्या आहेत आणि मातृत्व सुरक्षेचं महत्त्व समाजात रूजण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करता आहेत. या संघटनेच्या आग्रहास्तव सरकारनं 2003 मध्ये 11 एप्रिल कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्त्व दिवस’म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित केला.

मूल जन्माला घालण्याआधी आणि जन्माला घातल्यानंतर बाईचं सुरक्षित आणि सुदृढ आरोग्य हा तिचा अधिकार आहे, हे प्रत्येकीच्या मनात बिंबवणं हाच "व्हाइट रिबन्स अलायन्स आॅफ इंडिया"चा मूळ उद्देश आहे. त्यासाठी मातोच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुविधांच्या बळकटीकरणाचं काम ही संघटना करते. आरोग्य सेविकांचा क्षमता विकास करणं, मातृ सुरक्षेच्या योजनांमध्ये वाढ करणं, यासाठी तंत्रज्ञान विकसित करणं, वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रशिक्षण आयोजित करणं यासारखे उपक्रम संपूर्ण देशभरात या संघटेनेमार्फत राबवले जातात.

एकीकडे देशात मातामृत्यूचं प्रमाण आजही जास्त आहे तरीही गर्भवती स्त्रियांपर्यंत, मातांपर्यंत किफायतशीर दरात पुरेशा आरोग्य सेवा, माहिती, तंत्रज्ञान पोहोचवलं, त्यांना आपल्या आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्याविषयी जागृत आणि शिक्षित केलं तर हे प्रमाण नक्कीच कमी होवू शकतं. गर्भावस्थेत सकस आहार घेणं, प्रसुती झाल्यानंतर लगेच अर्ध्या तासात बाळाला स्तनपान करणं या गोष्टी तिच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीनं, नवजात बाळाला रोगांपासून दूर ठेवणाऱ्या त्याच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी किती महत्त्वाच्या आहेत हे स्त्रियांना पटवून देण्यासाठी ही संघटना कार्य करते आहे.

मातामृत्यू म्हणजे केवळ एका व्यक्तीचं आणि एका कुटुंबाचं नुकसान नसतं. संपूर्ण देश ते नुकसान सोसत असतं. देश ती स्त्री देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात करू शकणाऱ्या योगदानाला मुकतो. समाज तिच्या सल्ला मसलतीला मुकतो. आणि तिचं स्वत:चं कुटुंब तिच्या प्रेमाला, काळजीला, तिच्या पोषणाला आणि उत्पादनक्षमतेला मुकतो आणि म्हणूनच प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीपश्चात स्त्रीचं आरोग्य सुरक्षित राहाणं खूप महत्त्वाचं आहे हा व्यापक विचार घेऊन व्हाइट रिबन अलायन्स आॅफ इंडिया काम करत आहे.

या संघटनेच्या मते मातामृत्यू रोखण्याचे महत्त्वाचे मार्ग म्हणजे * प्रत्येक गर्भवती स्त्रीची प्रसुती ही दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होणं. * किशोरवयीन आणि मातावयीन मुलींमधलं अ‍ॅनेमियाचं प्रमाण कमी करणं.* गर्भावस्थेत सकस आहार घेण्याच्या महत्त्वाबद्दल स्त्रियांना माहिती शिक्षण देणं. * कुटुंबनियोजनाचं महत्त्वं आणि त्याचे सुरक्षित उपाय याबद्दल स्त्रियांमध्ये जनजागृती करणं. * गर्भावस्थेत प्रत्येक स्त्रीनं आपली पुरेपूर काळजी घेणं. * बाळाला स्तनपान करण्याचं महत्त्व प्रत्येक स्त्रीला पटणं. * प्रसूतीनंतर मातेच्या वेदना, अतिरक्तस्त्राव, संसर्ग रोखणारे औषधं, वैद्यकीय सेवा प्रत्येक स्त्रीला उपलब्ध असणं* बालविवाह रोखणं* प्रसूतीदरम्यान येवू शकणाऱ्या अडचणींची जाणीव खूप आधीच होणं. * प्रसूतीदरम्यान, प्रसूतीनंतर स्त्रीची योग्य काळजी घेणं* लैंगिक आजार रोखणं आणि नियंत्रित करणं* मातेला आणि तिच्या बाळाला प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणं आणि सर्वात