शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चेकवर तहसीलदारांच्या सहीनंतर रक्कम वाढवली; लिपिकाचा सात वर्षात २६ कोटींचा अपहार

By राजकुमार जोंधळे | Updated: January 31, 2023 18:11 IST

२६ कोटींचे अपहार प्रकरण; दोघे अटकेत तर दाेन आराेपी अद्यापही फरार

लातूर : २२ काेटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांच्या अपहार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता हा अपहार २६ काेटींवर पाेहोचला आहे. या प्रकरणातील दाेघे आराेपी अद्यापही फरारच आहेत, तर अटकेत असलेल्या दाेघांच्या काेठडीची मुदत साेमवारी संपल्याने त्यांना लातूरच्या न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले. न्यायालयाने २ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या काेठडीत वाढ केली आहे. या अपहार प्रकरणाचा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीकडून चाैकशी सुरू आहे. त्याचबराेबर, पाेलिसांकडून समांतर तपास केला जात आहे.

पाेलिसांनी सांगितले, अटकेतील मनाेज नागनाथ फुलेबाेयणे (रा.बाेरी, ता.लातूर) हा जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा शाखा विभागात लिपिक, महसूल सहायक अव्वल कारकून या पदावर कार्यरत हाेता. दरम्यान, त्याच्याकडे विविध प्रकारच्या खरेदीची, विविध शाखा, पुरवठादार यांच्याकडून येणारी देयके तपासून सक्षम प्राधिकार यांच्या मान्यतेने संबंधितांना देयकाचे धनादेश देणे, आरटीजीएस करण्यासाठी बँक व्यवस्थापकास निर्देशपत्र देणे, नाेंदवहीत नाेंद घेणे, बँक व्यवहार हाताळणे आदींची जबाबदारी हाेती. मात्र, मनाेज फुलेबाेयणे याने २६ मे, २०१५ ते ८ जून, २०२२ या काळात बनावट आरटीजीएस तयार करून, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे धनादेशातील मूळ रकमेच्या आकड्यामध्ये स्वहस्ताक्षरात वाढ करून, असे आरटीजीएस, धनादेश स्वत:च्या, मित्राच्या बँक खात्यात जमा केले. यातूनच त्याने तब्बल २२ काेटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांचा अपहार केल्याचे चाैकशीत समाेर आले. 

या प्रकरणात एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मनाेज फुलेबाेयणे, अरुण फुलेबाेयणे, सुधीर रामराव देवकत्ते आणि चंद्रकांत नारायण गाेगडे यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी मनाेज फुलेबाेयणे आणि चंद्रकांत गाेगडे या दाेघांना अटक केली आहे. ते सध्याला एमआयडीसी ठाण्यांच्या काेठडीत आहेत.

दाेघा आराेपींचा पाेलिसांना चकवा...काेट्यवधींच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी एका लिपिकासह अन्य तिघांविराेधात २१ जानेवारी राेजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दाेघांना पाेलिसांनी अटक केली आहे, तर अरुण फुलेबाेयणे आणि सुधीर रामराव देवकत्ते हे अद्यापही पाेलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांच्या मागावर पाेलीस पथक असून, त्यांनाही लवकरच अटक केली जाणार आहे, असे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले म्हणाले.

औसा तहसीलमध्ये ८८ लाखांचा अपहार...लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक मनाेज फुलेबायेणे याने औशातही तब्बल ८८ लाखांचा अपहार उघड झाला आहे. हा अपहार त्याने सात दिवसात केल्याचे चाैकशीत समाेर आले आहे. लातूर येथील अपहारासाठी वापरलेली माेड्स त्याने औशातील अपहारातही वापरल्याचे उघड झाले आहे. याची कुणकुण लागताच, तहसीलदारांनी बजावलेल्या नाेटिशीनंतर त्याने ही रक्कम तहसीलदारांना खात्यात जमा केली.

 

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचार