शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

युवराज पन्हाळे हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; पाच निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 20:09 IST

तरुण व्यावसायिक युवराज पन्हाळे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी आरोपी संतोष व्यंकटराव पन्हाळे, मधुकर अनुरथ बस्तापुरे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

लातूर : तरुण व्यावसायिक युवराज पन्हाळे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी आरोपी संतोष व्यंकटराव पन्हाळे, मधुकर अनुरथ बस्तापुरे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर या प्रकरणातील पाच जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.खाजगी शहर बस सेवेच्या व्यवसायातून युवराज पन्हाळे यांची आदर्श कॉलनी परिसरात ४ डिसेंबर २०१२ रोजी डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात युवराज पन्हाळे यांचा सख्खा पुतण्या संतोष व्यंकट पन्हाळे, मधुकर बस्तापुरे, भाऊ व्यंकट पन्हाळे आदींसह पाच जणांवर शिवाजीनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.सदर प्रकरणाचा शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गोपाळ रांजनकर यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात एकूण आठ आरोपींचा समावेश होता. यापूर्वीच छाया पन्हाळे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर सातपैकी दोघांना जन्मठेप सुनावली व उर्वरित पाच जणांची निर्दोष मुक्तता झाली़ सरकार पक्षाच्या वतीने सोलापूर येथील अ‍ॅड़ आर. आर. पाटील यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले.सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तताकमलाकर अनुरथ ऊर्फ अनिरूद्ध बस्तापुरे (४२, रा. रेणापूर), गोविंद पांडुरंग कुटवाड (३४), व्यंकट पांडुरंग कुटवाड (३४), गणेश अंगद सगर (२३, रा. तिघेही रामवाडी, खरोळा ता. रेणापूर) आणि व्यंकट ज्ञानोबा पन्हाळे (५१, रा. हरंगुळ ताजिलातूर) यांची निर्दोष मुक्तता झाली. युवराज पन्हाळे हे औसा रोडवरील त्यांच्या कार्यालयातून रात्री १० वाजण्याच्या सुमारास आदर्श कॉलनीतील घरी पोहोचले होते. घरासमोर कार उभी करून गेट उघडण्यासाठी उतरले असता त्यांच्यावर हल्ला झाला होता. घटनास्थळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी नातेवाईक व मित्रपरिवाराने त्यांना अशोक हॉटेलजवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्राणज्योत मालवली होती. युवराज पन्हाळे यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायात भरारी घेतली होती.

टॅग्स :laturलातूर