लहुजी शक्ती सेनेतर्फे अभिवादन सभा
लातूर : क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या स्मृतीदिनानिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने खाडगाव, रिंगरोड येथे बुधवारी सकाळी १०.३० वाजता अभिवादन सभा घेण्यात येणार आहे. यावेळी विचारवंत माजी प्राचार्य डाॅ. माधवराव गादेकर, प्रा.डाॅ. शिवाजीराव जवळगेकर, दयानंद कांबळे, सुरेश चव्हाण, काशिनाथ सगट, मायाताई लोंढे, संतराम मोठेराव, बापूसाहेब मगर, रवि कदम यांची उपस्थिती राहणार आहे. समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अजय कांबळे, सुजित मोटे, रमाकांत मगर, श्रीराम मगर, आकाश क्षीरसागर आदींनी केले आहे.
युवक काँग्रेसच्या वतीने आज निदर्शने
लातूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारने सदरील दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी लातूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने कामदार पेट्रोल पंप गांधी चौक येथे बुधवारी सकाळी ११ वाजता निदर्शने करण्यात येणार असल्याचे शहर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन सुरवसे यांनी सांगितले. सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाॅर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुलमध्ये वसंत पंचमी
लातूर : येथील लाॅर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये वसंत पंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण लाटे, प्राचार्या दुर्गा भताने, रौफ शेख, मकरंद सबनीस, शाहुराज कचरे, नम्रता डांगे, नूतन खंदारे, गणेश इरकर, विद्या कदम, गंगा लच्छेवार, भीमराव लच्छेवार आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
सृष्टी जगताप हिचा लातुरात सत्कार
लातूर : सलग २४ तास लावणी नृत्य सादर करून ‘एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद केल्याबद्दल सृष्टी सुधीर जगताप हिचा लातूर येथील महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डाॅ. भाऊराव यादव, दत्तात्रय चांबारगे, उत्तम गोरे, प्रा.डाॅ. मेघराज पवळे, डाॅ. स्नेहल यादव, देवराज गोरे, रमेश यादव, सोमनाथ निटुरे, कविता गोरे, अभिमन्यू पवळे, राणी पवळे, सागर पवळे यांची उपस्थिती होती. यावेळी सृष्टी जगताप हिच्या आई-वडिलांचाही महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.