शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! लातूरात पोलिसांची शस्त्रे, विविध विभागांची माहिती घेण्यात विद्यार्थी हरखून गेले

By हणमंत गायकवाड | Updated: January 4, 2024 18:04 IST

लातूर जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाची विद्यार्थ्यांना ओळख; शस्त्रास्त्रेही पाहिली

लातूर : पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त लातूरच्या क्रीडा संकुलात पोलिस दलाच्या वतीने भव्य प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये जिल्हा पोलिस दलातील वेगवेगळ्या विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहलीच्या रूपाने क्रीडा संकुलात प्रदर्शन पाहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पोलिस दलाच्या कामकाजाची ओळख होत आहे.

सायबर सेल, गुप्त विभाग, भरोसा सेल, मानव तस्करी विरोधी पथक, बॉम्बशोधक पथक, शास्त्र विभाग, क्राईम ब्रँच, इन्वेस्टिगेशन व्हॅन, डॉग स्कॉड, वाहतूक सुरक्षा, वायरलेस यंत्रणा, सुरक्षा हेल्पलाइन अशा विविध विभागाच्या माहितीचे आणि शस्त्राचे प्रदर्शन पोलिस स्थापना दिनाच्या (रेझिंग डे) निमित्ताने भरविण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय डोंगरे यांनी गुरुवारी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मार्गदर्शन केले. पोलिस दलाच्या वेगवेगळ्या विभागाची माहिती त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना दिली. अन्य शाळांतील विद्यार्थ्यांना त्यांनी प्रदर्शन पाहण्यासंदर्भात आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांनी अन् नागरिकांनी पोलिस दलाचे कामकाज जाणून घ्यावे जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पुढील आठवडाभर पोलिस दलाचे प्रदर्शन सुरू राहणार आहे. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी प्रदर्शन पाहून पोलिस दलाच्या कामकाजाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला....लातूर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना पोलिस दलाचे प्रदर्शन दाखविले जात आहे. गुरुवारपासून प्रदर्शन पाहण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. बहुतांश सर्वच शाळांचे विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. जणू विद्यार्थ्यांच्या सहलीचं प्रदर्शन पाहण्यासाठी शाळांकडून आयोजित केल्या जात आहेत, असे चित्र क्रीडा संकुलात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसlaturलातूरStudentविद्यार्थी