शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक विक्रमाला सुरूवात; लातूरची सृष्टी जगताप करणार सलग १२६ तास नृत्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 08:03 IST

आजपासून ३ जून पर्यंत नृत्यअविष्कार 

लातूर :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त लातूरच्या सृष्टी जगताप या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने जागतिक विक्रमात नोंद होण्याच्या दृष्टीने सोमवारी सकाळी ७ वाजता नृत्याला प्रारंभ केला. ती सलग १२६ तास नृत्य अविष्कार सादर करणार आहे. हा सलग नृत्यअविष्कार लातूरकरांना रात्र दिवस पाहता येणार आहे . जागतिक विक्रमाची नोंद घेणाऱ्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसचे सर्व सोपस्कारही पूर्ण करण्यात आले आहेत . सोमवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल, प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांच्या उपस्थित प्रारंभ झाला. यावेळी सृष्टी जगताप, वडील सुधीर जगताप , आई संजीवनी जगताप , आजोबा बबन माने , रोहिणी माने ,विराज माकणीकर , किरण माने, यांची उपस्थिती होती.

लातूरच्या दयानंद महाविद्यालयात अकरावी विज्ञानमध्ये शिकणाऱ्या सृष्टी जगताप हिने वर्ष-२०२१ मध्ये सलग २४ तास नृत्य सादर करीत आशिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद केलेली आहे . त्यानंतर आता सलग १२६ तास नृत्य सादर केल्याचा नेपाळ येथील नृत्यांगनेच्या नावावर असलेला विक्रम ती मोडणार आहे.  

भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांचे  निमित्त साधून सृष्टीने हा जागतिक विक्रम भारताकडे खेचून आणण्याचे ठरवले आहे . यासाठी तिने कठोर परिश्रम करीत सलग १०० तासा पेक्षा जास्त नृत्य सादर करण्याचे प्रात्यक्षिक अनेकदा केले आहे . यासाठी ती दररोज पहाटे पासूनच विशिष्ट प्रकारचा व्यायाम करते आहे . 

 

 सृष्टी ही नृत्य विशारद आहे . दहावीला तिला ९९ टक्के गुण होते . आता ती अकरावी पूर्ण करून बारावीच्या वर्गात जाणार आहे . जागतिक विक्रम असल्याने सृष्टीला संपूर्ण लातूरवासियांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सृष्टी जगताप आणि तिच्या कुटूंबियानी केली आहे . सलग नृत्य सादर करताना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या नियमा प्रमाणे तासाला 5 मिनिटे तिला विश्रांती घेता येणार आहे.  सृष्टी जगताप सलग नृत्य करणार असल्याने लातूरकरांसाठी दयानंद सभागृह पूर्ण वेळ खुले असणार आहे . मध्यरात्री आणि पहाटे देखील प्रेक्षक रसिकांनी प्रोत्साहन द्यायला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

टॅग्स :guinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड