यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले. कोरोनामुळे शिक्षणाची परिस्थिती अडचणीची असली तरी ब्रिज कोर्स विविध उपाययोजना करून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. ब्रीज कोर्स संदर्भात आलेल्या समस्यांबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता डाॅ. भागिरथी गिरी यांनी मार्गदर्शन केले. ब्रिज कोर्सचे स्वरूप, व्याप्ती, प्रभावी अंमलबजावणीची दिशा, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची भूमिका, अंतर्गत चाचण्या ,कृतीआराखडे तयार करणे, पूरककृती, कोविड कॅप्टन, विषय मित्र, गल्लीमित्र, गणित पेटी, भाषापेटी, इंग्रजी पेटी, पाठ्यपुस्तकांचा वापर, स्क्रिन टाईम, सेमी इंग्रजी ब्रीज कोर्स, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलांसाठी विशेष काय करता येईल या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. यावेळी जेष्ठ अधिव्याख्याता राजेंद्र गिरी, विजयकुमार सायगुंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल दशवंत आदींसह अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती. संचलन विषय सहाय्यक प्रभाकर हिप्परगे यांनी तर आभार आय.टी.चे विषय सहायक सतीश सातपुते यांनी मानले.
जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST