शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महिलेने ७२ वर्षीय वृद्धासोबत बनवला अश्लील व्हिडीओ;१५ लाखांची खंडणीही उकळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 18:36 IST

दोघांनी आम्ही पोलीस आहोत, तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देत खंडणी उकळली

अहमदपूर (जि. लातूर) : एका महिलेने स्वत:चे एका ७२ वर्षीय व्यक्तीसोबत अश्लील चित्रीकरण करून दोघा साथीदाराच्या साहाय्याने सदरील व्यक्तीस धमकी देत १४ लाखांची खंडणी वसूल केली. दरम्यान, आणखी एक लाख रुपये खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, अहमदपुरातील भारत काॅलनीतील रूपाली ढगे व मुसा अल्लाउद्दीन शेख आणि जाकीर गुलाबसाब शेख (रा. चारटांगी, अहमदपूर) यांनी कट रचून उदगीर तालुक्यातील सुकणी येथील शेतकरी विठ्ठल दिगंबर मुळे (वय ७२) यांची संपूर्ण माहिती काढली. त्यानंतर मागील महिन्यात ते विठ्ठल मुळे यांच्या शेतात गेले आणि त्यांना मद्य पाजले. 

दरम्यान, अश्लील चित्रीकरण केले. त्यानंतर ५ मे ते १५ जूनपर्यंत आरोपी असलेल्या दोघांनी आम्ही पोलीस आहोत, तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देत पहिल्या वेळी १० लाख, दुसऱ्यावेळी ४ लाख असे एकूण १४ लाख रुपये सुकणी, शिरूर ताजबंद व तळेगाव रोड अहमदपूर येथे खंडणी वसूल केली. त्यानंतर आरोपी महिला व तिचे साथीदार पुन्हा वेळोवेळी पैशांची मागणी करू लागले. तेव्हा मुळे यांनी अहमदपूर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली.

दरम्यान, १५ जून रोजी आणखीन दोन लाखांची मागणी केली; परंतु तडजोडीनंतर एक लाख द्यायचे ठरले. त्यानुसार अहमदपूर बसस्थानकात बुधवारी दुपारी ४ वाजता ठरलेला व्यवहार करताना पोलिसांनी आरोपीस रंगेहात पकडले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा अहमदपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार हे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी मुसा शेख यास व्यवहार करताना, तर रूपाली ढगे हीस काळेगाव रस्त्यावरून अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी जाकीर शेख फरार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर