शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाकडून कत्तीने गळा चिरून पत्नीची हत्या; उकळते तेल टाकले

By राजकुमार जोंधळे | Updated: May 14, 2023 20:55 IST

अहमदपूर येथील घटना : चारित्र्याच्या संशयावरून शिक्षकाने काढला पत्नीचा काटा

अहमदपूर (जि. लातूर) : चारित्र्याच्या संशयावरून शिक्षकाने पत्नीचा कत्तीने गळा चिरला, हातावर व पाठीवर सपासप वार केले. त्यानंतर उकळते तेल अंगावर टाकून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदपूर शहरात घडली. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, हालसी (ता. निलंगा) येथील रहिवासी असलेल्या वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी (वय ४३) या शिक्षकाची २०११ साली परभणी जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात बदली झाली. दरम्यान, सध्याला ताे खंडाळी (ता. अहमदपूर) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे. अहमदपूर येथे राजसारथी कॉलनीत पत्नी शामल (वय ३५), ११ आणि ९ वर्षांच्या दोन मुलींसह ताे वास्तव्याला होता. काही दिवसांपूर्वी त्याने आपली मोठी मुलगी छत्रपती संभाजीनगर येथील भावाकडे शिक्षणासाठी पाठविली होती. सध्या घरात वैजनाथ, पत्नी शामल आणि ९ वर्षांची मुलगी असे तिघेच राहत हाेते.

वैजनाथ हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यामध्ये सतत वाद होत असत. पतीकडून हाेणाऱ्या सततच्या मारहाणीने त्रस्त झालेल्या पत्नीने यापूर्वी त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पाेलिस ठाण्यात गेली होती. मात्र, नातेवाइकांनी समजूत काढल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली हाेती. मात्र, त्यानंतर शिक्षक वैजनाथ याने शांत डाेक्याने कट रचून पत्नीची हत्या केली.

याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात मयत शामल यांचा भाऊ मनोज प्रभाकर ढोले (वय २४, रा. श्रीमाळी, ता. भालकी, जि. बिदर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी याच्याविराेधात रविवारी गुरु नं. २२७ / २०२३ कलम ३०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

शांत डाेक्याने कट रचून हत्या...

शुक्रवारी, १२ मे राेजीच्या रात्री पत्नी शामल आणि मुलीचे जेवण झाल्यानंतर वैजनाथ याने लहान मुलीला आतल्या खोलीत झोपवले. पत्नी शामल आणि वैजनाथ हे हॉलमध्ये झोपले होते. रात्री ११:०० ते १२:०० वाजण्याच्या सुमारास वैजनाथ याने अत्यंत शांत डोक्याने बायकोचा कत्तीने गळा चिरला. हतावर, पाठीवर सपासप वार करून अंगावर उकळते तेल टाकले. यामध्ये पत्नी शामलचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने घराचा दरवाजा पुढे करत धूम ठाेकली.

दुधवाल्यामुळे समाेर आली घटना...

पहाटे दूधवाला दूध घेऊन घरी आला असता, त्याने आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्याने दरवाजा ढकलताच हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दम्यान, पाेलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पंचनामा केला.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी