पाठलाग करून बाप-लेकावर २२ जणांनी केला हल्ला; वडिलांचा मृत्यू,मुलगा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 06:11 PM2021-05-19T18:11:26+5:302021-05-19T18:15:42+5:30

Murder in Latur आमच्याविरुद्ध औराद पोलीस ठाण्यात तक्रार का दिलीस, आज तुला खल्लास करतो, असे पाठलाग करताना म्हटले.

'Why did you lodge a complaint in the police station'; Murder of an old man by old quarrel | पाठलाग करून बाप-लेकावर २२ जणांनी केला हल्ला; वडिलांचा मृत्यू,मुलगा गंभीर जखमी

पाठलाग करून बाप-लेकावर २२ जणांनी केला हल्ला; वडिलांचा मृत्यू,मुलगा गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देयातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून २१ जण फरार आहेत.

निलंगा (जि. लातूर) : आधी झालेल्या भांडणाची कुरापत काढून तालुक्यातील सिंदखेड शिवारात अनिल तात्याराव सोळुंके (५५, रा. येळनूर) यांचा सोमवारी दुपारी खून करण्यात आला. मंगळवारी याप्रकरणी २२ जणांविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आकाश अनिल सोळुंके व अनिल तात्याराव सोळुंके हे दोघे दुचाकीवरून जात होते. त्याच वेळेस त्यांचा पाठलाग दिलीप सोळुंके, सिद्धू माने, विक्रम सोळुंके, दीपक सोळुंके, व्यंकट माने, तानाजी माने, बंकट माने, बिभीषण पवार, शेखर पवार, शिवाजी माने, परमेश्वर माने, सचिन सोळंके, सिद्धेश्वर सोळंके, सुरेश सोळुंके, पवन सोळुंके, विनोद सोळुंके, विशाल सोळुंके, वृश्चिकेत पवार, करण सोळंके, राहुल पवार, संजय सोळुंके, राजू सोळुंके (सर्वजण रा. येळनूर) हे आपल्या चारचाकी वाहनातून करीत होते. त्यांच्या हातात काठ्या, चाकू, दगड होते. या सर्वांनी अनिल सोळुंके व आकाश सोळुंके यांना आमच्याविरुद्ध औराद पोलीस ठाण्यात तक्रार का दिलीस, आज तुला खल्लास करतो, असे पाठलाग करताना म्हटले. त्यामुळे सोळुंके पिता-पुत्र जिवाच्या भीतीने दुचाकीवरून शिंदखेड-गुंजरगा पाणंद रस्त्याने निघाले. मात्र, २२ जणांनी पिता- पुत्र यांना सिंदखेड शिवारातील ओढ्यात गाठून काठी, दगड, चाकूने मारहाण केली. त्यात अनिल सोळंके मयत झाले तर त्यांचा मुलगा आकाश गंभीर जखमी झाला. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आकाश सोळुंके याच्या फिर्यादीवरून २२ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक उदय सावंत हे करीत आहेत.

नातेवाइकांचा आक्रोश...
मयत अनिल सोळुंके यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, त्या २२ आरोपींना जोपर्यंत अटक केली जाणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेऊन आक्रोश केला. तथापि, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस उपाधीक्षक डॉ. दिनेश कोल्हे यांनी घटनास्थळास भेट देऊन चौकशीचे आदेश दिले. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून २१ जण फरार आहेत.
 

Web Title: 'Why did you lodge a complaint in the police station'; Murder of an old man by old quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.