शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'...त्याची इच्छा काय, माझ्या लेकराचं ऐकून तरी घ्या'; अमोल शिंदेच्या आई-वडिलांचे आर्जव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 16:30 IST

सैन्य भरतीला जातो म्हणून पाच-सहा दिवसांपूर्वीच अमोलने सोडले गाव; मुलगा सुरक्षित येण्याची आई-वडिलांची अपेक्षा 

चाकूर (जि. लातूर) : सैन्य भरतीला जातो म्हणून चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल धनराज शिंदे याने पाच-सहा दिवसांपूर्वीच गाव सोडले होते. गेल्या सहा महिन्यात तो तीन-चार वेळा दिल्लीला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. मोलमजुरी आणि मंदिरात झाडलोट करून उपजीविका करणाऱ्या अमोलच्या आई-वडिलांना त्याचे दिल्लीला जाण्याचे कारण माहिती नाही. मात्र, तो सैन्य भरतीसाठी जात असे. दरम्यान, एटीएससह स्थानिक गुन्हे शाखा आणि चाकूर पोलिसांचे पथक चौकशीसाठी झरी बु. गावात दाखल झाले आहेत.

दिल्ली येथील संसद भवनात हिवाळी अधिवेशन सुरू असताना सुरक्षा कवच तोडून प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारलेल्या दोघांपैकी एक अमोल धनराज शिंदे आहे. तो चाकूर तालुक्यातील झरी बु. गावचा रहिवासी आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अमोलच्या पार्श्वभूमी संदर्भात झरी बु. गावांत तपास यंत्रणेचे वेगवेगळे पथक दाखल झाले आहेत. मात्र, याबाबतची माहिती गावकऱ्यांना नव्हती. अमोल शिंदे याचे आई-वडील मोलमजुरी आणि मंदिरात झाडलोट करतात. त्याचा मोठा भाऊ मुंबई येथे मिस्तरी काम करतो आणि दुसरा भाऊ लातूरमध्ये मोलमजुरीला जातो. तर एक बहीण विवाहित आहे. अमोलही गावात असल्यानंतर मोलमजुरीला जात असल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले आहे. वेगवेगळ्या खेळात त्याला रस असल्याने पोलिस व सैन्य भरतीची तो तयारी करीत होता. जिथे भरती आहे तिथे तो जात होता, असे गावातील काही नागरिकांनी सांगितले.

दिल्लीत सैनिक भरती आहे सांगून गेलाआई-वडील म्हणाले, दोन दिवसांपासून माेबाइल बंद...नोकरी लागत नसल्यामुळे अमोल नैराश्यात होता. ९ डिसेंबरला रात्री ७ वाजता तो दिल्लीला जातो म्हणून गेला. गावातही तो दररोज कामाला जात होता. तिकडे काय झाले माहीत नाही. गेल्या दोन महिन्यात तो दिल्लीला गेला होता. दिल्लीत भरती आहे, आता कागद मिळणार आहे, असे तो सांगत होता. १० तारखेपासून तर त्याचा मोबाइलच लागला नाही. ९ तारखेला दिल्लीला जाताना डबा करून दिला. त्याने तिकडे काय केले, आम्हाला माहिती नाही, असे अमाेलचे वडील धनराज, आई केशरबाई यांनी सांगितले.

त्याचे ऐकून तरी घ्या अमोल सरकारी नोकरीसाठी धडपड करत होता. काय गुन्हा केला, त्याची काय इच्छा आहे ते तर जाणून घ्या. त्याला मध्ये कसे जाऊ दिले. त्याला नोकरीची अपेक्षा होती. काय झाले हे,पण त्याचे म्हणणे तरी ऐकून घ्या. असा अशी आर्जव अमोलच्या आईने केले. तर पोलिस आले त्यांनी चौकशी केली. घराची झडती घेतली. पण आम्हाला काहीच माहिती नाही. तो पोलिस भरतीसाठी गेला एवढच. पोलिस आले तेव्हा पोरग जीवंत आहे की मेल एवढेच सांगा म्हंटले. तो आता सुखरूप घरी यावा,  आणखी काय बोलावे अशी अपेक्षा अमोलच्या वडिलांनी व्यक्त केली.

तपास यंत्रणांचा झरी बु. गावात तळ...दहशतवाद विरोधी, आरसीपी, नांदेड येथील एटीएस तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, आयबी आदी तपास यंत्रणांचे पथक झरी बु. गावांत दाखल झाले आहे. या पथकाने अमोलच्या आई-वडिलांसह नातेवाइकांकडे विचारपूस सुरू केली आहे. झरी बु. गावात सध्या पोलिस यंत्रणांचा तळ आहे. अमोलबाबत विचारणा केल्यानंतर भीतीपोटी कोणीही काही माहीत नसल्याचे सांगत आहेत. पाच-सात दिवसांपूर्वी तो गावात अनेकांना भेटला असला तरी माहिती नसल्याचेच गावातील लोक सांगत आहेत.

टॅग्स :laturलातूरlok sabhaलोकसभाCrime Newsगुन्हेगारी