शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

गोल्डन बॉयची खुराकाअभावी होईना वेट'लिफ्ट'!, वेटलिफ्टर आकाश गौंड अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 20:10 IST

स्पर्धेसाठी पौष्टिक आहाराची गरज,क्रीडा विभागाकडेही केली याचना...

महेश पाळणे

लातूर : परिस्थितीशी दोन हात करीत त्याच हातांनी वजनदार भार उचलत भीम पराक्रम करणाऱ्या लातूरच्या आकाश गौंडने अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा, तसेच खेलो इंडिया स्पर्धेत सलग दोन सुवर्णपदके पटकावीत आकाशाएवढी झेपही घेतली. त्याचे सर्वत्र कौतुकही झाले. मात्र, सध्या खुराकासाठी पैसे नसल्याने त्याच्या वजनदार कामगिरीला यापुढे ब्रेक लागतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

मूळचा निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील आकाश श्रीनिवास गौंड याने उत्कृष्ट लिफ्टिंग व स्नॅचच्या जोरावर वेटलिफ्टिंग खेळात सुवर्णपदक पटकावीत लातूरचे नाव देशभर गाजविले. चंडीगड येथे मार्चमध्ये झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत २३४ किलो वजन उचलत त्याने सुवर्णकिमया केली. त्यानंतर वाराणसी येथे मे महिन्यात झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्येही ५५ किलो वजनगटात जोरदार प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकाविले. स्वारातीम नांदेड विद्यापीठासाठी वेटलिफ्टिंग खेळात हे पहिलेच सुवर्णपदक होते. त्यामुळे त्याचा जयजयकार झाला; परंतु ते कौतुक तोंडीच झाले आहे.

स्पर्धेसाठी पौष्टिक आहाराची गरज...वेटलिफ्टिंग खेळात कौशल्यवाढीसाठी पौष्टिक आहार गरजेचा असतो. मात्र, आकाशची घरची परिस्थिती साधारण असून आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्यामुळे खुराकासाठी त्याला नेहमीच अडचण असते. स्पर्धेचा हंगाम जवळ आल्याने त्याला सध्या खुराक गरजेचा आहे. वेळीच मदत मिळाली तर येणाऱ्या स्पर्धेतून त्याला यापुढेही जाण्याची संधी मिळणार आहे.

क्रीडा विभागाकडेही केली याचना...

सुवर्णपदक विजेत्या आकाशने जिल्हा क्रीडा कार्यालयातही मदतीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचे पुढे काय झाले हे अद्याप समजले नाही. विद्यापीठाने बक्षीस देण्याचे ठरविले असून ते लवकर मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याची होणारी हेळसांड थांबेल. विद्यापीठ स्पर्धेसह राज्य ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने पदके पटकाविली आहेत. मात्र, पदक विजेत्या खेळाडूच्या पदरी सध्या तरी निराशाच आहे. चालू वर्षात विद्यापीठ स्पर्धेसह सिनिअर नॅशनल स्पर्धेत पदक मिळविण्याची त्याला संधी आहे. असे झाले तर त्याला भारतीय संघाच्या सराव शिबिरात संधी मिळून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही पात्रता मिळू शकते.

वेळेत मदत मिळाल्यास फायदा...सध्या मी विद्यापीठ स्पर्धेसह संघटनेमार्फत होणाऱ्या सिनिअर गटाच्या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहे. याच काळात मला मदत मिळाली तर माझा खुराकाचा खर्च भागेल. त्यामुळे येणाऱ्या दोन्ही स्पर्धेत मला पदक पटकावणे सुलभ होईल.- आकाश गौंड, सुवर्णविजेता, वेटलिफ्टर

टॅग्स :laturलातूर