शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी मांजरा प्रकल्पातून पाच बॅरेजेसमध्ये सोडले पाणी

By हणमंत गायकवाड | Updated: April 6, 2023 18:11 IST

२० लाख ७३ हजार रुपयांची सिंचन पाणीपट्टी भरणा झाला आहे. त्यानंतरच पाणी सोडण्यात आले आहे.

लातूर : उन्हाळी हंगामाकरिता मांजरा नदीवरील बॅरेजेसमध्ये मागणीनुसार आवश्यक परिगणना करून आगाऊ स्वरूपात सिंचन पाणीपट्टी भरणा करून पाणी सोडण्याचा निर्णय कालवा समितीमध्ये झाला होता. त्यानुसार मांजरा नदीवरील पाच बॅरेजेसची २० लाख ७३ हजारांची सिंचन पाणीपट्टी भरताच पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यात आले आहे. या पाच बॅरेजेसमध्ये आता ८.८५८ दलघमी पाणीसाठा झाला आहे. 

मांजरा नदीवरील ल्हासरा, बोरगाव-अंजनपूर, टाकळगाव-देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा-पोहरेगाव या पाच बॅरेजेससाठी पाणी सोडण्यात आले आहे. ल्हासरा बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता १.१३६ दलघमी आहे. त्यासाठी १.३९४ दलघमी पाणी सोडले आहे. टाकळगाव १.४०८, वांजरखेडा ३.२२६, वांगदरी १.२९२, कारसा-पोहरेगाव १.५३८ असे एकूण ८.८५८ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. .१९५ रुपये प्रतिघनमीटर या प्रमाणे पाणी देण्यात आले आहे. त्यानुसार २० लाख ७३ हजार रुपयांची सिंचन पाणीपट्टी भरणा झाला आहे. त्यानंतरच पाणी सोडण्यात आले आहे. 

धरणात उपलब्ध पाणीसाठा असा मांजरा धरणात सद्य:स्थितीत एकूण पाणीसाठा १५२.०५६ दलघमी आहे. यातील ४७.१३० दलघमी मृत पाणीसाठा असून, १०४.९२६ जिवंत पाणीसाठा आहे. या जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ५९.२९ आहे. त्यातील ८.८५८ दलघमी पाणी बॅरेजेससाठी देण्यात आले आहे. 

बॅरेजेसनिहाय पाणीपट्टी वसुली ल्हासरा, पोहरेगाव-अंजनपूर, टाकळगाव-देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा-पोहरेगाव या बॅरेजेसना पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी सोडण्यात आले आहे. बॅरेजेसनिहाय पाणीपट्टी वसुली करून अहवाल विभागीय कार्यालयास सादर करण्यात आला आहे. दरम्यान, बॅरेजेसमध्ये पाणी सोडताना व सोडण्यापूर्वी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. मागणी आल्यानंतर अन्य बॅरेजेससाठीही पाणी सोडले जाणार आहे. टाकळगाव-देवळा बॅरेजेससाठी १.९१, वांजरखेडा ३.६०, वांगदरी ०.८४० आणि कारसा पोहरेगावसाठी

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरणWaterपाणी