शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा संपला; लातूरसह चार शहरांना भेडसावणार समस्या

By हणमंत गायकवाड | Updated: May 27, 2024 16:23 IST

मागील दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून होतोय पाणीपुरवठा

लातूर : लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब, लातूर एमआयडीसी आदी मोठ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात जिवंत साठा संपलेला आहे. आता मृतसाठ्यातून प्रस्तुत गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी मांजरा प्रकल्पात ०.१७ टक्के म्हणजे ०.३०४ दलघमी जिवंत पाणीसाठा होता. मात्र आता जिवंत साठा शून्य झालेला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे झाले आहे. 

लातूर शहरासाठी दररोज मांजरा प्रकल्पातून ५० ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. या उचल केलेल्या पाण्यातून पाच दिवसांआड शहरात पाणीपुरवठा होतो. मार्च महिन्यामध्ये आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मृतसाठ्यावर आता पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे लातूरकरांना जपून पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून पुरवठाशुक्रवारी जिवंत साठ्यातील पाणी उचलले होते. शनिवारी मांजरा प्रकल्प मृतसाठ्यात आला. ४७.१३० दलघमी मृतसाठ्याची क्षमता आहे. आता प्रकल्पात ४६.८२८ दलघमी मृतसाठा आहे. दोन दिवसांत एवढी घट पाण्याची झालेली आहे. प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत पाणी पुरू शकते. तोपर्यंत पावसाळ्याचे तीन महिने संपलेले असतात. त्यातून नवीन पाण्याची आवक झाली तर टंचाई जाणवणार नाही. सद्य:स्थितीत मात्र मृतसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

पाण्याची उचल आणि बाष्पीभवन वाढलेउन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचा वापरही वाढलेला आहे. शिवाय, बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. एक दलघमी पाणी बाष्पीभवनात जात आहे. तर ५० ते ६० एमएलडी पाणी लातूर शहरासाठी उचलले जात आहे. धरणावर अवलंबून असलेल्या सगळ्या गावांना मिळून एक दलघमी पाणी उचलले जाते, अशी घट दररोजची होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरणWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका