शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मराठवाड्यात पाणघोडे, गेंडे, हत्ती अन् वाघांचा संचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

लातूर : गेली काही वर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मांजरा खोऱ्यात कधीकाळी पाण्याशिवाय राहू न शकणाऱ्या पाणघोड्यांचा, डरकाळी फोडणाऱ्या वाघोबांचा, ...

लातूर : गेली काही वर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मांजरा खोऱ्यात कधीकाळी पाण्याशिवाय राहू न शकणाऱ्या पाणघोड्यांचा, डरकाळी फोडणाऱ्या वाघोबांचा, हत्ती अन् गेंड्यांचाही संचार होता. मांजरा काठचा २७ हजार वर्षांपूर्वीचा हा इतिहास विख्यात पुराजीवशास्त्रज्ञ प्रा. डॉ. विजय साठे यांनी सोमवारी उलगडून सांगितला.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालय व लातूर येथील इतिहास संशोधन संस्थेच्या वतीने डॉ. साठे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संग्राम डोंगरगे होते, तर राधाकृष्ण जोशी, रवि पाटील, राज्य दर्शनिका विभागाचे माजी संपादक डॉ. अरुणचंद्र पाठक, प्रकाश फंड, सचिन मोरे, प्राचार्य महेश्वर बेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. साठे म्हणाले, १९७४ पर्यंत मांजराचे पुरावैभव तसे अज्ञात होते. धनेगाव धरण उभारणीसाठी १९७४ साली झालेल्या खोदकामात वन्यजीवांची हाडे आढळली व मांजरेच्या पुरावैभवाचा खजिनाच हाती लागला. अंबाजोगाईचे प्रा. चितळे व डेक्कन कॉलेजचे तत्कालीन भूपुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. रा. वी. जोशी यांनी १९७५ ते १९८९ केलेल्या संशोधनातून ही हाडे २७ हजार वर्षांपूर्वींच्या रानटी बैल, हत्तींचे असल्याचे सिद्ध झाले. अश्मयुगीन हत्यारेही हाती लागली. घनेगाव, गांजूर ताडोळा, वांगदरी येथील जलोढांमध्येही जीवाश्म मिळाले. मी व माझ्या चमूने केलेल्या उत्खननात रेणापूर तालुक्यातील हरवाडी परिसरात वाघ, पाणघोडा, गेंडा, हत्ती, रानघोडा, रानगवे, हरीण, काळवीट, निलगायींची हाडे आणि शेकडोंनी शंख शिंपले सापडले. कार्बन कालमापनावरून ती २२ ते ३४ हजार वर्षांपूर्वींचे असल्याचे कळले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी केला. प्रास्ताविक डॉ. सदाशिव दंदे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. सुरेंद्र स्वामी यांनी, तर डॉ. साठे यांचा परिचय डॉ. सुनील पुरी यांनी दिला. आभार शहाजी पवार यांनी मानले.

मराठवाड्यात पुरातत्व संग्रहालयाची गरज !

पुरावैभव लाभलेल्या भूमीचे जतन करण्यासाठी लातुरात पुरासंग्रहालय होणे गरजेचे असून, मराठवाड्यातील अशा अन्य भागांचा पुढेही अभ्यास व संशोधन व्हावे, अशी अपेक्षा डॉ. साठे यांनी व्यक्त केली.