शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

मूल दत्तक घ्यायचे आहे का ? अशी करावी लागेल कायदेशीर प्रक्रिया !

By हणमंत गायकवाड | Updated: December 30, 2023 13:58 IST

लातूरच्या तीन शिशुगृहातून सहा मुलांना दिले दत्तक; दोन बालकांना परदेशातील मातापित्यांच्या मायेची उब

लातूर: केंद् व राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत शिशुगृहातील अनाथ मुला,मुलींना दत्तक देण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील शासनमान्य तीन शिशुगृहातील सहा बालकांना दत्तक देण्यात आले आहे. त्यातील दोन बालकांना परदेशातील माता-पित्याच्या मायेची ऊब मिळाली आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये मदर तेरेसा, संधी निकेतन शिशुगृह आणि लातूर शहरांमध्ये श्री गणेश शिशुगृह आहे. या शिशुगृह बालसमितीकडून आलेल्या अनाथ बालकांना दत्त विधान प्रक्रिया करून दत्तक देण्यात आले आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये सहा बालकांना दत्तक देण्यात आले आहे. त्यातील चार बालके देशांतर्गत दत्तक दिली आहेत तर दोन बालके परदेशात गेली आहेत. त्यातील एक इटली आणि दुसरे कॅनडा येथील पालकांनी दत्तक घेतले आहे.

दत्तक घेण्यासाठी असे आहेत नियम व अटीअधिनियम २०१५ व सुधारित २०२१ दत्तक नियमावली २०२२ नुसार दत्तक विधान प्रक्रिया राबवली जाते. दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करूनच भारी इच्छुक माता-पित्यांना बालक दत्तक दिले जाते.

- दत्तक घेणारे माता-पिता शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरूपात सक्षम असणे आवश्यक आहे. पती-पत्नी दोघांचीही सहमती असणे आवश्यक.

- एकल महिला दत्तक घेत असेल तर मुलगा किंवा मुलगी निवडू शकते. एकल पुरुष फक्त बालकाची निवड करू शकतो. बाळ दत्तक घेण्यासाठी बालकाचे वय दोन वर्षाच्या आत असावे.

- दत्तक घेणाऱ्या माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तरित्या ८५ वर्ष असावे. दत्तक घेणाऱ्या एकल मातेचे कमाल वय ४० वर्षे असावे.

- दोन ते चार वर्ष वयापर्यंतच्या बालकाला दत्तक घ्यायचे असेल तर दत्तक घेणाऱ्या मात्या-पित्यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तरित्या ९० वर्षांची असावी. दत्तक घेणाऱ्या एकल माता, पित्याची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी.

आठ वर्षांपर्यंतचे बालक दत्तक घ्यायचे असेल तर.....चार ते आठ वर्षांपर्यंत चे बालक दत्तक घेण्यासाठी दत्तक घेणाऱ्या माता-पित्याची संयुक्त वयोमर्यादा १०० वर्ष असावी. एकल माता किंवा पित्याची कमाल वयोमर्यादा ५० वर्षे असावी तर बालकांचे वय आठ ते अठरा वर्षांपर्यंत असेल तर दत्तक मातापित्याची कमाल वयोमर्यादा संयुक्तरीत्या ११० वर्ष असावी.

ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करा....दत्तक घेणाऱ्या एकल माता, पित्याचे कमाल वय ५५ वर्षे असावे. दत्तक विधानासाठी अर्ज दत्तक विधानामार्फत बाळ घेऊ इच्छिणाऱ्या भावी माता, पित्यांनी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा. तसेच दत्तक विधानाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधता येईल. -  देवदत्त गिरी,महिला व बालविकास अधिकारी, लातूर

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधाबालकांच्या अनुषंगाने कोणतीही तक्रार असेल किंवा बालक दत्तक घ्यायचे असेल, बालकाविषयी काही माहिती द्यायची असेल तर १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. गेल्या नऊ महिन्यांमध्ये सहा बालकांना दत्तक देण्यात आले आहे त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.  - धम्मानंद कांबळे बाल संरक्षण अधिकारी, लातूर

टॅग्स :laturलातूरSocialसामाजिक