शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के, नऊ गावांमध्ये भूगर्भातून आवाज !

By राजकुमार जोंधळे | Updated: September 24, 2022 06:24 IST

प्रशासन सतर्क : ग्रामस्थांनी घाबरू नये - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

राजकुमार जोंधळे / लातूर

लातूर : नऊ गावांमधून भूगर्भातून आवाज आले. दरम्यान, तीन सौम्य धक्के झाल्याची अधिकृत माहितीही समोर आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पत्रपरिषद घेऊन ग्रामस्थांना घाबरू नये, असा दिलासा दिला आहे. तसेच प्रशासन सतर्क असून, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला असल्याचे स्पष्ट केले.

हासोरीसह अन्य गावांतील भूगर्भातील आवाज हे सौम्य धक्के होते, हे समोर आलेले आहे. त्यामुळे औराद आणि आशिव या ठिकाणी भूकंपमापन यंत्र बसविण्यात आले आहे. त्यावरून सूक्ष्म निरीक्षण केले जात आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्राचे अभ्यासक यावर लक्ष ठेवून आहेत. ग्रामस्थांमध्ये जनजागरणाचे कार्य नियमित सुरू असून, गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन भीती पसरणार नाही, याची काळजी घ्यावी.

हासोरीत पहिल्यांदा आले आवाज...

 ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून १२ मिनिटांनी हासोरी गावात भूगर्भातून आवाज आले. ग्रामस्थ घरांमधून बाहेर पडले. अनेकांनी पशुधन सुरक्षितस्थळी हलविले होते. त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजताही सौम्य धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते. तसेच १२ सप्टेंबरला रात्री १० वाजून ७ मिनिटांनी अनेकांना आवाज आणि हादरा जाणवला होता. अद्यापपर्यंत भूगर्भातील हालचालींमुळे, पोकळी निर्माण झाल्याने आवाज येत असावेत, अशी मांडणी केली जात होती. परंतु, भूकंपमापन केंद्रावर नोंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हासोरीसह नऊ गावांमध्ये झालेले आवाज भूकंपाचे सौम्य धक्केच असल्याचे स्पष्ट होत आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण...

निलंगा तालुक्यातील ज्या गावांमध्ये भूगर्भातून आवाज जाणवले, त्या गावांमध्ये प्रशासन पोहोचले आहे. स्थानिक अधिकारी सतत संपर्कात आहेत. सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासह त्या-त्या गावांतील प्रमुख व्यक्तींचे सहकार्य घेऊन आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, यासाठीही समुपदेशन केले जात आहे. धोकादायक घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध नागरिक यांची माहिती संकलित करून सुरक्षित स्थळांचा आढावा घेतला आहे.                                                                                                                - पृथ्वीराज बी.पी., जिल्हाधिकारी

टॅग्स :Earthquakeभूकंपlaturलातूरcollectorजिल्हाधिकारी