शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाकाहारी लोकांमध्ये व्हिटामीन बी १२ चे प्रमाण कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 21:39 IST

जे लोक शाकाहारी आहेत, कधी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करीत नाही, अशा लोकांमध्ये व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

 - आशपाक पठाण

लातूर - जे लोक शाकाहारी आहेत, कधी दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करीत नाही, अशा लोकांमध्ये व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे चिडचिडेपणा, अशक्तपणा व थकवा जाणवत असून यातून हातपाय दुखणे, नसांचे आजार उद्भवतात़ त्यामुळे रूग्णांणी यावर वेळीच काळजी घेऊन आपल्या आहारात आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहेत, असा सल्ला डॉ. विश्रांत भारती यांनी दिला आहे.अनेकजण सकाळी लवकर उठत नाहीत.  त्यामुळे सकाळचे कोवळ्या उन्हात फिरण्याचा फारसा संबंधही येत नाही. त्यातच पुन्हा खानपानातही काळजी घेतली जात नसल्याने विविध आजार बळावतात. शाकाहारी लोकांमध्ये सध्या व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण कमी होताना दिसत आहे. यामुळे चिडचिडेपणा येत असून थकवाही जाणवत आहे. यापासून बचाव करण्यासाठी शाकाहारी लोकांनी दुध व दुग्धजन्य पदार्थ जास्तीत जास्त खाणे आवश्यक आहे. याशिवाय, महिन्यातून किमान एकवेळा मांसाहार केल्यास  आपल्या शरिरात व्हिटॅमीन बी १२ चे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते़ अनेकदा आपण अशक्तपणा किंवा थकवा जाणवल्यास दुर्लक्ष करतो. मात्र, असे न करता वेळीच चाचणी करून घेणे गरजेचे आहे़ शरिरातील बी १२ कमी झाल्यास त्यातून उद्भवणारे आजार हे गंभीर स्वरूपाचेही असू शकतात़ सध्या धावपळीच्या युगात अनेकांना कामातून वेळ मिळत नाही, चिडचिडेपणा आल्यावर त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे डॉ़ विश्रांत भारती म्हणाले.कार्यालयात बसणा-यांना अधिक त्रास  शासकीय, खाजगी कार्यालयात काम करणाºयांमध्येही काम करणा-या व्यक्ती, तसेच जास्तीत जास्त वेळ कार्यालयात बसणाºयांना व्हिटॅमीन डीचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळेच अनेकांना अचानकपणे विविध आजार जडत आहेत़ यापासून बचाव करण्यासाठी वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. मानवी शरिरात व्हिटॅमीनचे योग्य प्रमाण आवश्यक असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ व्हिटॅमीन डी साठी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे गरजेचे आहे. शिवाय, कधीतरी मांसाहारही गरजेचा असल्याचे डॉ़ भारती यांनी सांगितले.काय आहेत लक्षणेशरिरात व्हिटॅमीन बी १२ चे कमी झाल्यास सर्वात प्रथम अशक्तपणा, पायी चालताना लवकर थकवा जाणवतो किंवा चिडचिडेपणा निर्माण होतो. काही दिवसांनी नसांमध्ये कमजोरी, मेंदूवर परिणाम होण्याचा धोका असतो़ त्यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ़ भारती यांनी सांगितले.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य