शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात कर्तव्यावर कोटपा कायद्याचे उल्लंघन; सात जणांवर दंडात्मक कारवाई

By हणमंत गायकवाड | Updated: May 27, 2024 19:55 IST

लातूर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाच्या अचानक शासकीय कार्यालयात धाडी

लातूर: शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असताना तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शनिवारी धाडी टाकण्यात आल्या असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, तंबाखू विरोधी कायद्यानुसार (कोटपा-२००३) सात जणांवर यावेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शिवाय,कार्यालय प्रमुखांना पावती पुस्तक देऊन तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

लातूर शहरामध्ये तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय, शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय, सर्व शिक्षा अभियान कार्यालय व परिसरात कारवाई करण्यात आली. पान, सुपारी, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायदा कोटपा २००३ नुसार पालन करणे बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान होते. तसेच जे खात नाहीत, त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असून आपल्या युवा पिढीला यापासून वाचविण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

कार्यालय प्रमुखांनी कारवाई करावी....कार्यालय प्रमुखांनी आपल्या अंतर्गत असलेले कर्मचारी, अधिकारी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खात असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. त्यासाठी जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणे,बाळगणे विक्री करणे, कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालय तंबाखूमुक्त ठेवले पाहिजे. जे खातात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई......जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या पथकामध्ये डॉ. माधुरी उटीकर, बोंबरे, कृष्णा राठोड, दीपक पवार यांचा समावेश होता. या पथकाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमान वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यालयांना भेटी देऊन कार्यालय प्रमुखांना पावती पुस्तक दिले.तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करताना आढळलेल्या सात जणांवर दंडात्मक कारवाई केली.

तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे कायद्याने गुन्हा..तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सार्वजनिक ठिकाणी बाळगणे, विक्री करणे, खाणे, थूंकणे कायद्यानुसार गुन्हा आहे.कार्यालय प्रमुखांनी आपले कार्यालय तंबाखूमुक्त ठेवले.पाहिजे जे खातात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी,असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत.त्यानुसार या मोहिमे अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी