शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Video: पूल, पक्क्या रस्त्यासाठी नदीपात्रात बसून ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन

By हरी मोकाशे | Updated: August 1, 2023 18:39 IST

पावसाळ्याच्या दिवसात नदी वाहू लागली की एसटी महामंडळाची बस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयास येता येत नाही.

जळकोट (जि. लातूर) : जळकोट ते दापका राजा या दोन गावांदरम्यान परटोळ नदी आहे. या नदीवर पुलाची निर्मिती करावी तसेच रस्त्याचे मजबुतीकरण करुन डांबरीकरण करावे, या मागणीसाठी मंगळवारी जळकोट तालुका विकास परिषद, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी चक्क नदीपात्रातील पाण्यात बसून आंदोलन केले. हे आंदोलन जवळपास ५ तास सुरु होते.

जळकोट ते मुखेड तालुक्यातील दापका राजा या दोन गावांमध्ये तीन किमीचे अंतर आहे. या दोन्ही गावांदरम्यान नदी आहे. पावसामुळे या नदीपात्रातून पाणी वाहत आहे. दरम्यान, या तीन किमीच्या अंतराच्या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये- जा करताना नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या नदीवर पूल नसल्याने जळकोटातील नागरिकांना शेतीकडे ये- जा करणे कठीण झाले आहे. नदी तुडुंब भरुन वाहू लागल्यानंतर वाहतूक ठप्प होते. विशेष म्हणजे, दापका राजा येथील जवळपास ४० ते ५० विद्यार्थी जळकोटला शिक्षणासाठी दररोज ये- जा करीत असतात. पावसाळ्याच्या दिवसात नदी वाहू लागली की एसटी महामंडळाची बस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयास येता येत नाही. खाजगी वाहने सुरु राहत असली तरी पालकांना तेवढा खर्च दररोज करणे परवडत नाही.

जळकोट ते दापका राजा दरम्यानच्या नदीवर पूल मंजूर करून त्याचे तात्काळ बांधकाम करण्यात यावे. तसेच या रस्त्याचे मजबुतीकरण करुन डांबरीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी जळकोट तालुका विकास परिषदेचे अध्यक्ष संग्राम कदम व नगरसेवक प्रा. गजेंद्र किडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नदीपात्रातील पाण्यात बसून अनोखे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात नगरसेवक शिवलिंग बोधले, संतोष म्हेत्रे, विनोद देवशेट्टी, रामलिंग वाडकर, शिवसेना तालुकाप्रमुख मन्मथ बोधले, बालाजी कवठेकर, मल्लिकार्जुन गुड्डा, प्रकाश कारभारी, गणपत गंगोत्री, संजय देशमुख, शिवकुमार गुड्डा, आदिनाथ सिद्धेश्वर, उपसरपंच अरुण जोगदंड, माधव भ्रमण्णा यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

पाच तास झाले आंदोलन...या आंदोलनाची जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी यांना माहिती देण्यात आली. तेव्हा सीईओ सागर यांनी पूल निर्मितीचा आणि रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच तात्काळ तयार करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पाच तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :laturलातूरStudentविद्यार्थीagitationआंदोलन