येथील वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित ८७ वा धर्मवीर संग्रामप्पा शेटकार वचन सप्ताह व्याख्यानात सोमवारी डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी कोरोनाविषयक माहिती व संरक्षण या विषयावर ६ वे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बालाजी पाटील टाकळीकर होते. यावेळी शंकरप्पा हरकरे उपस्थित होते.
डॉ. चिकमुर्गे यांनी कोरोना काळातील अनुभव सांगत कोरोनाची लाट वाढण्यासाठी आपला हलगर्जीपणा कारणीभूत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत उपचाराबद्दल तितकीशी माहिती नव्हती, मात्र तीव्रता ही कमी होती. दुसऱ्या लाटेत मात्र तीव्रताही वाढली आणि उपचाराबाबतचे ज्ञानही मिळाले, असे सांगत कोरोना संदर्भातील समज-गैरसमजाबाबत माहिती दिली.
प्रास्ताविक वीरशैव समाजाचे सदस्य ॲड. एस. टी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन गुरुप्रसाद पांढरे यांनी केले. आभार उत्तरा कलबुर्गे यांनी मानले.