तसेच लोकमान्य गणेश मंडळ पणजोबा गणपती मंडळाच्या वतीने पाटील गल्ली, ब्राह्मण गल्ली, गलाले गल्ली, म्हाळस गल्ली येथे धूर फवारणी करण्यात आली.
या लसीकरणाचे उदघाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. नरहरी सुरनर, प्रविणा पाटील, भुसुम, गणेश केंद्रे ,गणेश सूर्यवंशी, अनिकेत काशीकर उपस्थित होते.
यावेळी शहरातील १८ वर्ष वयोगटा पुढील नागरिकांना कोवाक्सिन व कोविडशिल्ड लस देण्यात आली. लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष संगम पाटील, मार्गदर्शक विजय पाटील, बालाजी पाटील, माधव पाटील, दिनेश पाटील, दयानंद पाटील, सरिता अनिल पाटील, वैभव नंदू पाटील, राम पाटील, चंद्रकांत पागे, पांडुरंग लोकरे, तुकाराम लोकरे, प्रतिक जाधव ,अक्षय कदम, आदिनाथ पाटील, साईनाथ पाटील, अमित पाटील, ओम पाटील, रोहित पाटील, आकाश माने, उद्धव पौळ ,गणेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.