शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सुटी संपली, उद्यापासून शाळांची घंटा वाजणार; १९ हजार विद्यार्थांचा पहिल्याच दिवशी होणार प्रवेश!

By संदीप शिंदे | Updated: June 14, 2023 14:49 IST

शाळांतील वर्गामध्ये पुन्हा बच्चेकंपनीचा किलबिलाट ऐकावयास मिळणार

लातूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून पहिलीसाठी पात्र असणाऱ्या १९ हजार ३९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. गुरुवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असून, पहिल्याच दिवशी या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. तसेच पुष्पगुच्छ, गणवेश आणि पुस्तके देऊन त्यांचे शाळांमध्ये स्वागत करण्यात येणार आहे.

उन्हाळी सुटी संपली असून, गुरुवारपासून शाळांची घंटा वाजणार आहे. शाळांतील वर्गामध्ये पुन्हा बच्चेकंपनीचा किलबिलाट ऐकावयास मिळणार असून, उन्हाळी सुट्टीत शिक्षण विभागाकडून पहिल्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १९ हजार ३९ विद्यार्थी असून, यामध्ये ९७५३ मुले तर ९२८६ मुलींचा समावेश आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवगत विद्यार्थ्यांची गावात बैलगाडीद्वारे मिरवणूक काढण्यात येणार असून, पुष्पगुच्छ, पुस्तके, गणवेश देऊन स्वागत करण्यात येणार आहे. शिक्षण विभागकडूनही शाळांना याबाबत सूचना करण्यात आल्या असून, शाळांनीही प्रवेशोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे.

तालुकानिहाय असे आहेत विद्यार्थी...प्रवेशपात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूर तालुक्यातील ३६५५, रेणापूर ११२०, औसा ३६५५, निलंगा २६९९, शिरूर अनंतपाळ ७६४, देवणी १०६३, उदगीर १७६२, जळकोट ८१३, अहमदपूर १७९७ तर चाकूर तालुक्यातील १७११ अशा एकूण १९ हजार ३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे करणार स्वागत...गुरुवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार असल्याने पहिलीच्या वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात येणार आहे. गावस्तरावर फुगे, फुलांनी सजविलेल्या बैलगाडी, ट्रॅक्टरद्वारे प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची मिरवणूकही काढण्यात येणार आहे. तसेच पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक यांचाही यामध्ये सहभाग राहणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाlaturलातूर