लसीकरणाची मोहीम सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार टप्प्याटप्प्याने लसीकरण होत आहे. परंतु, सर्व व्यवहार सुरू करताना शासनाने कोरोना संदर्भातील काही निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यात प्रामुख्याने मास्क वापरणे अनिवार्य असून, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले.
संस्था, कार्यालयांमध्ये पथके जाणार
सर्व संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये पथके जाणार आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क वापरा, असा इशाराच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिला आहे.
नागरिकांनी साथ द्यावी : महापौर
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लक्षणे दिसताच स्वत: तपासणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती देताना त्यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्वत:चा अनुभव सांगितला. सतत मास्क वापरल्यामुळे त्यांच्या कुटुंबात अथवा संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. त्यामुळे स्वत:साठी आणि परिवारासाठी मास्क वापरावा, असे गोजमगुंडे म्हणाले.