शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युच्या दाढेतून परतल्यानंतर ध्येयच बदलले;किराणा दुकानदाराच्या मुलाचे जिद्दीवर UPSC त यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 18:15 IST

UPSC Result: घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत खेड्यातल्या किराणा दुकानदाराच्या मुलाचे दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी

लातूर : घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही त्यावर मात करीत उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या खेडेगावातील किराणा दुकानदाराचा मुलगा रामेश्वर सब्बनवाड याने यूपीएससी परीक्षेत २०२ वी रँक मिळवित यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्याच प्रयत्नात त्याने यशाची पताका लावली असून, गावातील पहिला यूपीएससी उत्तीर्ण होण्याचा मानही मिळविला आहे. 

रामेश्वर सुधाकर सब्बनवाड हा उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील आहे. कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ आहे. कुटुंबास एकरभरही शेती नाही. त्यामुळे उदरनिर्वाह हा छोट्याशा किराणा दुकानावर आहे. रामेश्वरचे प्राथमिक शिक्षण गावातील रामराव पाटील प्राथमिक विद्यामंदिरात झाले. त्यानंतर ५ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षणलातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात पूर्ण झाले. १२ वी पुणे येथील भारतीय जैन संघटनेच्या महाविद्यालयात झाली.

त्याच्या आईचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असतानाही मुलगा शिकून डॉक्टर व्हावा अथवा कलेक्टर व्हावा, अशी इच्छा होती. परंतु, घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याने नाइलाजास्तव पुण्यातील शासकीय महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने ८ महिने खासगी कंपनीत नोकरी केली. तद्नंतर १६ महिने मुलांची शिकवणी घेतली.

दरम्यान, आईची दुसरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने २०१९ पासून यूपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली. २०२० मधील पहिल्या प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोहोचला. परंतु, अवघे सहा गुण कमी पडल्याने यश मिळाले नाही. त्यामुळे त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले आहे.

ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी प्रयत्न...रामेेश्वर सब्बनवाड म्हणाला, २०१८ मध्ये मी खूप आजारी पडलो होतो. त्यामुळे मला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. तेव्हा ग्रामीण भागातील परिस्थिती, आरोग्य सेवा अगदी जवळून पाहिली. आपण शिक्षण घेऊन मोठे झालो तरी आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे ग्रामीण भागाचा आणि खेड्यातील तरुणांची प्रगती साधावी म्हणून यूपीएससीच्या तयारीस लागलो. जिद्दीने अभ्यास केल्याने हे यश मिळाले आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगlaturलातूरEducationशिक्षण