शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अडचणी शेतकऱ्यांची पाठ सोडेना, अवकाळी पावसाचा टोमॅटो पिकांना तिसऱ्यांदा फटका

By संदीप शिंदे | Updated: May 22, 2023 18:38 IST

टोमॅटो उत्पादनातुन मिळणारा फायदा तर मिळालाच नाही उलट लागवडीचा खर्च वाया गेला असल्याने शेतकरी मोठ्या सकंटात सापडले आहे.

शिरूर अनंतपाळ : अवकाळी पावसाने यंदा चांगलाच कहर केला असून, फळबाग उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असल्याने टोमॅटो बागेस फटका बसला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे टाकले आहे.

शिरूर अनंतपाळ प्रकल्पाचा तालुका असल्याने तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन भेंडी, मेथी, चवळी, दोडका, मटकी, काकडी, कोथिंबीर यासह टोमॅटोची लागवड करीत आहेत. यंदा टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. तीन महिन्यापुर्वी लागवड केलेले टोमॅटो ऐन लग्नसराईत काढणीस येतील आणि त्यातुन चार पैसे मिळतील असे वाटत असतानाच महिनाभराच्या कालावधीत तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीचा टोमॅटो बागेस फटका बसला असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत झाले आहेत. अनेकांच्या शेतात टोमॅटोचा सडा पडला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादनातुन मिळणारा फायदा तर मिळालाच नाही उलट लागवडीचा खर्च वाया गेला असल्याने शेतकरी मोठ्या सकंटात सापडले आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या कशा करायचे असा प्रश्र अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.

तालुक्यात यंदा ४६ हेक्टर्सवर लागवड...तालुक्यातील विविध गावात यंदा ४६ हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्रावर टोॅमटोची लागवड करण्यात आली होती. परंतु महिनाभरात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी गारपीटीचा टोमॅटो बागेस फटका बसला असल्याने अनेकांच्या शेतात टोमॅटोचा सडा पडला असल्याचे धोंडीराम कारभारी, विठ्ठलराव पाटील, संजीव गुणाले, सदानंद पाटील यांनी सांगितले.

वाढत्या तापमानामुळे वाढ खुंटली...एप्रिलच्या अखेरीपासुनच तापमानाचा पारा वाढत गेला असून, मे महिन्यात तर तापमान ४० अंशावर गेले असल्याने फळावर आलेल्या बागेत मोठ्या प्रमाणात फळगळती होत आहे. नवीन लागवड केलेल्या रोपट्यांची वाढ खुंटत असल्याचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण खताळ यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी...फळबाग उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या अडचणीत आले असून, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना महिनाभरात तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी गारपीटीचा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर